पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरू. [ स्तबक राज्यावर बसल्यावर त्याने कित्येक दिवस कडकडीत तप करून महादेवास ' प्रसन्न करून घेतलें, व त्यांच्याकडून मला यमपुरीचें दर्शन होऊं नये आणि मी रणांत सर्वांना जिंकावें, असा वर मिळविला. पुढे बळीने दशदिशा जिंकून विपुल संपत्ति मिळविली, व शुक्राचार्यादि मोठमोठे ब्राह्मण बोलावून यांच्याकडून विश्वजित् यज्ञ केला. यज्ञसमयी दशदिशा जिंकून आणलेले द्रव्य त्यानें ब्राह्मणांना दिलें. ज्यावेळी यशाची पूर्णाहूति झाली, त्या वेळीं यज्ञकुंडातून धनुष्य, अक्षय भाते, अमेद्य कवच व सुवासिक कमलमाला यांसहित स्थ निघाला. असा तो यज्ञाचा प्रसाद मिळाल्यावर बळीला फार आनंद झाला व त्याने सर्व ब्राह्मणांना अनेक दानें देऊन संतोषित केले. तो बळीराजा राज्य करीत असतां त्याच्या प्रजाजनांनां कोणत्याहि प्रकारची दुःखें माहित नव्हती. - सर्व लोक सन्मार्ग असून त्यांनां पापाचा गंधहि नव्हता. सर्व प्रजा राजाला आपल्या पित्याप्रमाणे मानीत असून राजाहि आपल्या प्रजेला पुत्राप्रमाणे वागत होता; बळीने पुष्कळ दिवस राज्य केल्यावर त्याला जरासंध, काळयवन, केशी बगैरे राक्षस, त्याच्या या वैष्णवी बाण्याला नावें ठेवू लागले. राक्षसाच्या कुलाला तूं कलंक लावलास असें ते ह्मणूं लागले. तुझ्या वाडवडिलांची विष्णूने अत्यंत विटंबना केली, असे असून तूं त्याची भक्ति करितोस हें अत्यंत निंद्य होय. याप्रमाणे राक्षसांनी बळीला अनेक गोष्टी सांगितल्यावर बळीला तें ह्मणणे खरें बाटले व त्यानें तेव्हांपासून देवांशी विरोध धरला. बळीनें देवांशी युद्ध करून त्यांनां जिंकण्याचा विचार केला, व तो सेना गोळा करूं लागला. त्याने सर्वत्र आपले दूत पाठवून देशोदेशींचे दैत्यवीर आणिले. प्रल्हाद, ककुंद, कुंभक, अनाहद, चतुर्मुख, मेघनाद, रिठासुर, सहस्रबाहु, सुनाभ, सहसजेठी, निकुंभ, काळयवन, जरासंध, वज्रबाहु, गजोदर, कुंभकर्ण, शिरोध्वज, शतलोचन, मेनक, चाण, मकरासुर, सुसर्प, विरूपाक्ष, यक्षभी, सुमुख, बाळक, कांचनाक्ष, धनंजय, शंबरासुर, हयग्रीव, पुलोमा, असिलोमा, चंद्रभास्कर, वृत्रासुर, एकचक्र, बगैरे असंख्य रणकुशल दैत्य बळीने आणिले. हे वर्तमान इंद्राला कळल्यावर, त्यानें सर्व देवांनां विनंति करून त्यांनां बळीबरोबर युद्ध करण्यासाठी बोलाविले. विश्वदेव, समुद्र, यक्ष, किन्नर, अकरा रुद्र, मृत्यु, गंधर्व, राजर्षि, कुबेर, वरुण, पर्वत, सिद्ध, चारण, अवधूत, विद्याधर, अष्टदिशांचे दिक्पाळ, अष्टवसु, महाबळ, चगैरे अनेक देववीर आपले सैन्य घेऊन, इंद्राला साह्य करण्यासाठी आले. दोहोंकडची तयारी झाल्यावर भयंकर लढाई झाली, दोहोंकडच्या सैन्याचा नाश होऊन मुख्य मुख्य वीर तेवढेच युद्ध करण्यासाठी राहिले. यमाला प्रल्हादानें, चंद्राला चंद्रभास्कर राक्षसानें, मारुताला हयग्रीवानें, वायूला पुलोमानें, अश्विनीदेवाला वृत्रासुरानें, कुबेराला अनुर राक्षसानें, वरुणाला विप्रचित्तीनं, प्रवीराला नमृचीनें, गुरूला केशी राक्षसानें, रंगभीरूला बाणानें, विश्वक