पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२.] अध्याय ५ वा. १०५ 66 यामुळे मला माझी जात सांगतां येत नाहीं. तसेंच माझे अद्यापि लग्नहि झालेले नाहीं." हें त्या स्त्रीचें भाषण ऐकून राजा ह्मणाला, "हे सुंदरी! तूं जर मजबरोबर विवाह करिशील तर मी तुला पट्टराणी करीन व तुझ्या वचनांत वागत जाईन.” मग मोहिनीनें राजाजवळून भाष्यदान मागून घेऊन ती राजाबरोबर नगरांत आली; उभयतांचे सहवासांत कांहीं दिवस गेल्यावर मोहिनीला गरोदरावस्था जाणवू लागली, तेव्हां ती राजाला ह्मणाली, "मला पुत्र व्हावा ह्मणून मी एक व्रत आरंभिले आहे. त्या व्रताची सांगता करण्यासाठी आज आपण अभ्यंगस्नान केले पाहिजे, आपल्या अंगाला तेल वगैरे लावून मोच आज आपणाला स्नान वालीन." विरोचन राजाला ती गोष्ट खरी वाटली व तिनें सांगितल्याप्रमाणे तो खानाला बसला. पण मस्तकावरचा मुकुट काढीना, तेव्हां मोहिनीनें राजाला भाष्यदानाची आठवण देऊन मुकुट काढावयाला लाविलें. विरोचनाने याप्रमाणे मुकुट काढल्यावर, मोहिनीनें राजाच्या मस्तकावर आंगठा ठेऊन त्यावर सर्व त्रिभुवनांचा भार घालून त्याच्या शरीराचा चुरा करून मेदमांसाचा मेदि- नीवर पर्वत केला. याप्रमाणें विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून विरोचनास मारल्यावर सर्व देवांना मोठा आनंद झाला व मोहिनीजवळ येऊन त्यांनी विष्णूची फार स्तुति केली. त्यावेळीं नारद देवाला ह्मणाला; " देवा ! आपण हल्लीं गरोदरावस्थेत आहांत याबद्दल मला फार लज्जा वाटते, आतां प्रसूत काली तुमचें कसें होईल याची मला मोठी काळजी लागली आहे." हें नारदाचें विनो- दाचें बोल ऐकून मोहिनीनें आपला डावा पाय झाडला त्याबरोबर डाव्या पायाच्या अंगठ्यांतून पुत्र खाली पडला, त्याचें नांव बळी असें ठेवून त्याला विरोचनाचे राज्यावर बसविलें व सर्व देव आपआपले स्थानी गेले. नारद व विष्णु बळीला राज्यावर बसवून वैकुंठीं जात असतांना वाटेंत नारद एका नदीत स्नानासाठी गेला; नारदानें पाण्यांत बुडी मारली व वर येऊन प्राणायामासाठी नाकाला हात लावला, तो हाताला नथ लागली. मग नारद आपल्या सर्व शरीराकडे पाहूं लागला, तों सर्व शरीर पालटून आपण एक तरुण स्त्री झालो आहों असे त्याने पाहिले. आपण भगवंतास स्त्रीरूप धारण केल्याबद्दल नांवें ठेविली त्याचा हा प्रसाद भगवंतांनी आपणास दिला, असेंहि त्याच्या लवकरच लक्षांत आलें. तो नदीबाहेर येऊन विष्णूला शोधूं लागला, पण विष्णु त्याला कोठेंही मिळाला नाही. पुढे एका यक्षाशी नारदाचें लग्न झाले. त्या यक्षापासून नारदाला साठ संवत्सर पुत्र झाले. नंतर भगवंतास नारदाची दया आली, व त्याने पुन्हां त्याला स्त्रीचा पुरुष केला. ३ बळीचा पराक्रम. बळीची उत्पत्ति विष्णूचे अंगुष्ठापासून झालेली असल्यामुळे त्यास विष्णूची अर्धकला असें झटलें आहे; तो बळिराजा मोठा पराक्रमी असून वैष्णव होता,