पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु [ स्तंबक

घालून वर मोहिनी देवी बसली आहे, तिला म्हाळसा असे म्हणतात. तेव्हां पासून राहू व चंद्र यांच्यांत वैर उत्पन्न झालें, व जेव्हां जेव्हां संधि मिळते, तेव्हां तेव्हां राहू चंद्राला ग्रासतो. मोहिनीने सर्व दैत्यांना मद्य वाढल्यावर राहिलेले मद्य भूमीवर टाकून दिले. त्या मद्यापासून मधुमती नावाची नदी निर्माण झाली. मद्यापासून निघालेली ती नदी ह्मणून सर्व त्या नदीची दया करीत असत, पुढे महादेवांनी त्या नदीला तीर्थाची योग्यता आगली. ग्रहणाचे वेळी त्या नदींत स्नान केल्याने सर्व पातकांचा नाश होतो. २ मोहिनी अवतार. 66 अमृत व मदिरा यांची अशी वांटणी झाल्यावर कांही दिवसांनी महादेवाची व विष्णूची भेट झाली, अनेक गोष्टी झाल्यावर महादेव विष्णूला ह्मणाले, भगवन् कमलापते ! कांहीं दिवसांपूर्वी तूं मोहिनी रूप धारण करून देव आणि दानव यांना अमृत व मदिरा दिलीस; तें तुझें मोहिनीरूप पाहण्याची मला इच्छा झाली आहे." महादेवांची ही इच्छा पुरी करण्याचें नारायणानें कबूल केले. व त्याने महादेवाला एका सुंदर उपवनांत येण्यास सांगून आपण अदृश्य झाले. विष्णूनें सांगितल्याप्रमाणे महादेव तत्काल उठले व उपवनांत आले. तें उपवन प्रत्यक्ष वैकुंठाधीशानें निर्माण केलें होतें. तेव्हां त्या उपवनाच्या वनश्रीचे वर्णन करणे अशक्य आहे. त्या उपवनांत सर्व प्रकारचे वृक्ष फलपुष्पांनी डुलत होते, लता मुवासिक फुलभारांनी लवल्या होत्या. लहान लहान फुलझाडांच्या फुलांचा सुवास सर्वत्र पसरला होता. ठिकठिकाणी बसण्यासाठी, कमलपत्रांचे मंडप घातले होते, त्यांत मयूर नृत्य करीत होते, कोकिला गात होत्या, कारंजी उडत होती, लहान लहान सरोवरें पाण्यानें तुडुंब भरून त्यांत कमळे फुलली होती. अशा त्या सुंदर उपवनांत महादेव हिंडत असतां त्यांची दृष्टी एका सुंदर स्त्रीकडे गेली. ती स्त्री, चेंडू खेळत खेळत व महादेवांवर नेत्रकटाक्ष टाकीत टाकीत महादेवांजवळ आली. तें मोहिनीचें अनुपमेय स्वरूप पाहून महादेवांच्या चित्तवृत्तीत बदल झाला व ते मोहिनीस धरण्याचा प्रयत्न करूं लागले. मोहिनी- रूप धारण केलेल्या विष्णूला महादेव कामातुर झाले आहेत, हे पाहून फार आश्चर्य वाटले व तो पळत पळत येऊन पार्वतीजवळ आपल्या पूर्व स्वरूपानें उभा राहिला. महादेव तेथे येऊन पाहतात, ती मोहिनी नसून भगवान् विष्णु उभा आहे. मग महादेवानें झालेल्या प्रकाराबद्दल अनुताप दर्शवून विष्णूची क्षमा मागितली. , विष्णूचें तें मोहिनीरूप पाहून महादेव देखील भुलले, मग ते स्वरूप पाहून विरोचन राजाची अवस्था वेड्यासारखी झाली यांत मोठेंसें नवल तें काय ? तो त्या मोहिनीजवळ गेला व तिला तूं कोठें राहतेस, इकडे कां आलीस ? तूं कोणाची स्त्री आहेस ? तुझी जात कोण ? वगैरे प्रश्न विचारूं लागला. तेव्हां मोहिनी ह्मणाली, "राजा ! माझे आईबाप कोण ते मला मुळीच माहित नाहीं,