पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय ५ वा. • नावाच्या सर्पाचा दोर करून समुद्राचें मंथन करण्यास आरंभ केला. देव हे वोपटीच्या बाजूने आणि राक्षस मुखाच्या बाजूनें ओढीत होते. त्या घर्षणामुळे वासुकीच्या मुखांतून बाहेर पडलेल्या विषानें भयंकर उष्णता उत्पन्न झाली व त्या उष्णतेचा त्रास सर्वांना होऊं लागला. तेव्हां महादेवानें तें विष प्राशन केले. पुढे त्या समुद्रमंथनांत लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, रंभा, ऐरावत, अमृत, विष, उच्चैःश्रवा अश्व, कामधेनु, शंख व हरिधनु, अशीं चवदा रत्ने निघालीं; समुद्रमंथन करितेवेळेस मंदराचल पर्वत - खाली जाऊं लागला, तेव्हां विष्णूंनी कुर्मरूप धारण करून तो पर्वत वर उचलून धरिला. वरील चवदा रत्नांची देव आणि असुर यांमध्ये वांटणी होत असतां अमृत आणि मदिरा या दोन रत्नांचा वाद सुरू झाला. दोघेही आपला हट्ट सोडीनात. तेव्हां या तंट्याचा निकाल करण्यासाठी देव आणि दैत्य विष्णू- कडे गेले, व दोघांनी या वादाचा निकाल करावा म्हणून त्याला विनंती केली; विष्णूने असे सांगितले की, देवांनी एका पंक्तीला व दैत्यांनी एका पंक्ती बसावें. त्यावेळी एक स्त्री येऊन अमृत व सुरा ही पंक्तींत वाढील, ज्याला जं मिळेल तें त्यानें त्यावेळी ग्रहण करावें. विष्णूचा हा विचार दोघांनांही पसंत पडला; व त्यांनी, लवकरच पंक्तिसमारंभ केला, एका पंक्तीला देव व दुसन्या बाजला दैत्य बसले. अशी तयारी झाल्यावर भगवान् विष्णु मोहिनीरूप धारण करून उभयतांना अमृत व मुरा वाढण्यासाठी आले. तें मोहिनीचे स्वरूप पाहून देव व दैत्य हे दोघेहि मोहित झाले. असुर तर देहभान विसरून जाऊन मोहिनीसाठी वेडे झाले. अशी असुरांची स्थिति झाल्यावर विष्णूनें अमृत देवांना व सुरा असुरांना दिली. त्यावेळी राहू कपटानें देवांच्या पंक्तीला बसून अमृत प्याला. हा प्रकार चंद्रानें विष्णूला नेत्रांच्या खुणेन कळविला. तेव्हां विष्णूस अत्यंत कोप येऊन त्याने आपले सुदर्शन चक्र त्याच्या मानेवर मारून शिरच्छेद केला. शिर खाली पडल्याबरोबर आकाशांत उडून गेलें, आणि धड पश्चिम समुद्राकडे वेगानें पळूं लागलें. तो प्रकार पाहून देव आणि राक्षस दोघेही घावरले, व धडाचा नाश करण्याचा प्रयत्न करूं लागले. परंतु त्यामुळे तें धड अधिकच उसळून धावू लागले. शंकरांनी आपला त्रिशूळ त्याच्या उदरांत घालून त्याचा नाश करण्याचा प्रयत्न केला; पण त्याच्या उदरांत अमृत असल्यामुळे त्याचा मुळींच नाश होईना. तेव्हां शंकरांनीं म्हाळसा नांवाच्या डोंगरावर त्या राहूच्या कंठनाळांत आंगठा घालून अमृत बाहेर काढले. तेच अमृत वहात वहात समुद्राला जाऊन मिळाले. त्या ओघाला प्रवरा नदी असे म्हणतात. ही प्रवरा उत्तर समुद्राला जाऊन मिळणार होती, फ्ण गौतमान शंकराची विनंती केल्यावरून ती गौतमीला झणजे गोदावरीला मिळून पूर्वसमुद्राला गेली. या गौतमी संगमावर राहूचे धड खाली