पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ स्तबक 1 प्रकारचें दुःख माहित नव्हते. सर्व प्रजा धन, धान्य, पुत्र वगैरे संपत्तीन युक्त असून हरिभक्तीत काळ घालविणारी होती. याप्रमाणें प्रल्हादानें आपल्या प्रजेचें पुत्रवत् अनंत वर्षे पालन केल्यावर त्यानें आपल्या विरोचन पुत्राच्या स्वाधीन सर्व राज्यकारभार करून वानप्रस्थाश्रम ग्रहण केला. विरोचन सूर्यभक्त असून त्यानें आपल्या भक्तिबळानें सूर्यास प्रसन्न करून अभेद्य कवच मिळविले होते. सूर्याने प्रसन्न होऊन विरोचनाला आपल्या मस्तकावरचा मुकुट दिला. तो मुकुट मस्तकावर असला, म्हणजे कोणापासूनहि भीति व्हावयाची नाही असा त्या मुकुटाचा प्रभाव होता. विरोचनास तो मुकुट मिळाल्यावर त्याला साहजिक अभिमान झाला व त्याने सर्व भूमंडळास आपल्या पराक्रमानें त्राही भगवान् करून सोडिलें. तेव्हां विरोचनाचें पारिपत्य कसे करावयाचें हा सर्वांना विचार पडला. पण कोणालाच योग्य असा उपाय सुचेना. मग भगवान् विष्णु मोहिनीरूप धारण करून पृथ्वीवर आला, व एका सुंदर उपवनांत राहिला. विरोचन राजा एके दिवशीं अरण्यांत शिकारीस गेला असतां अत्यंत तृषाक्रांत झाला व पाण्याचा शोध करूं लागला, पाणी शोधतां शोधतां तो राजा मोहिनी ज्या उपवनांत येऊन राहिली होती, त्याच उपवनांत येऊन एका सुंदर सरोवरावर आला, व तें थंड पाणी पिऊन शांत झाला. नंतर राजा त्या उपवनांत इकडे तिकडे हिंडत असतांना त्याच्या दृष्टीस मोहिनी पडली, तिला. पाहिल्याबरोबर राजा कामातुर झाला. देवाचें तें मोहिनीरूप पाहून महादेव- देखील देहभान विसरून गेला होता; मग विरोचनाची अवस्था मोहिनीला पाहून वेड्यासारखी झाली यांत आश्चर्य ते काय ? मासा ज्याप्रमाणें आमिषाला पाहून फसतो, किंवा पतंग दिव्यावर उडी घालून आपले शरीर जाळून घेतो, त्याप्रमाणें विरोचन त्या वेळी मोहिनीसाठी प्रयत्न करूं लागला. समुद्र- मंधनाचे वेळीं भगवानानें असेंच मोहिनीरूप धारण करून अमृत देवांना दिलें व सुरा असुरांना दिली. तेंच मनोहर मोहिनीरूप भगवंतानें या वेळी विरोच- नाचे नाशासाठीं धारण केलें होतें. " अध्याय ५ वा. १ समुद्रमंथन व राहूची कथा. जनमेजय राजानें वैशंपायन ऋषीला समुद्रमंथनाची कथा सांगावी, म्हणून विनंती केली. तेव्हां वैशंपायन ऋषि, जनमेजयाला ती कथा सांगू लागला. तो म्हणाला, "राजा ! पूर्वी देव आणि दैत्य यांनी समुद्रमंथन करून रत्ने काढाव- गाचा विचार केला. त्याप्रमाणे दोघांनीं मंदराचल पर्वताची रबी केली, व वासुकी