पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें.] अध्याय ४ था. ३ नरसिंह अवतार. 66 प्रसन्न करून असा भगवान्, बळीचे घरी राहून त्याची सेवावृत्ति करीत होता. बळी हा भग- वंताचा मोठा प्रियभक्त होता. बळीची कथा ऐकण्याविषयीं राजाची इच्छा जाणून वैशंपायन म्हणाला, राजा ! पूर्वी हिरण्याक्ष या नांवाचा एक महा प्रतापी राक्षस होऊन गेला. त्याने सर्व पृथ्वी रसातळांत घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हां नारायणानें वराह अवतार धारण करून त्या दैत्याचा नाश केला, व पृथ्वीचें संरक्षण केलें. त्याचा धाकटा भाऊ हिरण्यकशिपु होता, त्यानें भावाच्या मृत्यूमुळें देवांशीं वैरसुद्धां केलें. हिरण्यकशिपूनें महादेवाला वर मिळविला कीं, पशु, पक्षी, सर्प, कीटक, मनुष्य, देव, राक्षस व कोणताहि सचेतन किंवा अचेतन पदार्थ, यांपासून मला दिवसा व रात्रीं, आकाशांत व पृथ्वीवर मृत्यु येऊं नये. असा चमत्कारिक वर मिळविल्यामुळे तोहि सर्वोना अनावर झाला. त्या हिरण्यकशिपूला प्रल्हाद या नांवाचा एक पुत्र होता, तो मोठा भगवद्भक्त होता. तो असुराचा पुत्र असून वैष्णव कसा झाला ? असा प्रश्न उत्पन्न होतो; पण त्याचें कारण असें आहे. कीं, एकदां हिरण्यकशिपु शिकारीसाठी अरण्यांत गेला असतांना, मागें इंद्र त्याचे घरी येऊन त्याच्या स्त्रीला बलात्कारानें बरोबर घेऊन अमरावतीस जाऊं लागला, तेव्हां इंद्राला वाटेंत नारद भेटला व त्यानें इंद्राला, तिचा पति घरांत नसतांना गरोदरावस्थेत तिला घेऊन आलास हें तुला मुळींच शोभत नाहीं; वगैरे शब्दांनी इंद्राची फार फजिती केली व हिरण्यकश्यपूचे स्त्रीला त्यानें इंद्राजवळून घेऊन तिला तिचे घरीं पोचतें केले. त्यावेळी मार्गात नारद भगवंताचें भजनपूजन करीत असे; तो संस्कार प्रल्हादास गर्भात झाल्यामुळे तो मोठा भगवद्भक्त झाला. प्रल्हादानें विष्णूची भक्ति सोडावी म्हणून हिरण्यकशिपूनें फार प्रयत्न केला, त्यानें त्यासाठी प्रल्हादाला, समुद्रांत बुडविलें, विष पाजलें, व अमीतहि लोटलें, पण प्रल्हादानें हरीची भक्ति सोडली नाही. त्या भक्तीमुळेच तो सर्व प्रसंगांतून जिवंत पार पडला. कोणत्याच प्रयत्नास यश येत नाहीं असे पाहून एके दिवशीं हिरण्यकशिपु प्रल्हादाला म्हणाला, ज्या हरीची तूं एवढी भक्ति करितोस तो तुझा हरी कोठें आहे तें मला दाखीव." प्रल्हाद म्हणाला, "तो परमेश्वर सर्वत्र आहे. तो नाहीं असे या जगांत कांहींही नाहीं." हे ऐकून हिरण्यकशिपु अत्यंत रागावून परमेश्वर ह्या स्तंभांत आहे काय, असे प्रल्हादाला विचारूं लागला. प्रल्हाद म्हणाला, होय. या स्तंभांत देखील परमेश्वर आहे. असे म्हणाल्यावर हिरण्यकशिपूला अधिकच राग येऊन त्यानें जोराने खांबावर बुकी मारिलो, त्याबरोबर मोठी गर्जना करून भगवान् नारसिंह स्वरूपानें प्रगट झाला, आणि त्यानें हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादाला राज्यावर बसविलें. प्रल्हाद राज्य करीत होता तोपर्यंत त्याच्या प्रजेला व्याधीव्यथा, दारिद्य, वगैरे कोणत्याही