पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. १०० [स्तरक कमीपणा येईल; ह्मणून मला तूं जाण्याची परवानगी दे. मी नेहमी आपल्या सर्व भक्तांच्या सन्निध असतो, त्याप्रमाणें तुझ्याहि मी सन्निध आहे." विष्णूनें याप्रमाणे बळीला सांगितल्यावर बळीनें विष्णूला जाण्याची परवानगी दिली. मग भगवंतानीं चक्रतीर्थाचे ठिकाणीं वसुंधरेला पाताळांतून द्वार पाडलें व त्यांतून भगवान् व दुर्वासऋषी वर पृथ्वीवर आले, द्वार पाडले ह्मणून त्या ठिकाणाला द्वारका असें नांव पडलें. २ कुशदैत्याचा नाश. भगवान् व दुर्वासऋषी त्या तीर्थावर आल्यानंतर भगवंतानें दुर्वासाला तीर्थात स्नान करण्यास सांगितलें व आपण स्वतः त्याच्या रक्षणासाठी तेथे उभे राहिले. इतक्यांत तीर्थाच्या संरक्षणासाठी असलेले कुश दैत्याचे रक्षक दुर्वासऋषीच्या आंगावर धांवून येऊं लागले, परंतु विष्णूनें त्या सर्व रक्षकांचा मध्येंच नाश करून टाकला. त्या कुशराक्षसाच्या साठसहस्र रक्षकांना श्रीकृष्णांनी मारून टाकल्यावर त्या राक्षसाच्या राज्यांत मोठाच हाहा:कार उडाला. तो अनर्थ पाहून कुश राक्षसाचा बंधु, मुर या नांवाचा होता. तो विष्णूवर मोठ्या क्रोधानें धावून आला; तेव्हां भगवंतानें आपल्या चक्रानें त्याचा शिरच्छेद केला. तेव्हांपासून विष्णूचें मुरारि नांव पडलें. मुर दैत्य मेल्यावर त्याचा बंधु कुश विष्णूबरोबर युद्ध करण्यास आला, त्यानें विष्णूच्या हृदयावर त्रिशूल मारला, तो विष्णूच्या हृदयावर वठून खाली पडला. मग भगवंतानें चक्र सोडून कुश दैत्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले; पण त्याच्या सेवकांनी ते तुकडे एका ठिकाणी केल्यावर पुन्हां कुश जिवंत झाला व विष्णुबरोबर युद्ध करूं लागला. याप्र- माणें विष्णूनें सात वेळां कुशाला मारिलें; तरी तो सातही वेळां जिवंत होऊन युद्ध करूं लागला. नंतर भगवंतानें त्याला मारल्याबरोबर त्यांचें मांस भूमीत पुरलें व तं कोणी काढूं नये म्हणून त्यावर शिवाची शाळुंखा ठेविली. अशा- प्रकारें कुश दैत्याचा नाश झाल्यावर भगवान् वासुदेव, तो खरा शिवभक्त अस ल्यामुळे प्रसन्न झाला व कांहीं मागावयाचे असल्यास माग असे म्हणाला. तो दैत्य म्हणाला, "देवा ! मी जरी खरोखर शिवभक्त आहे, तरी या तीर्थाचे ठिकाणी आतां तूंच अक्षय्य वास करावा अशी माझी इच्छा आहे." भगवान् त्याला तथास्तु म्हणून दुसरा असा वर दिला की, तुझे शरीरांतून जे रक्त सांडलें आहे, त्यापासून दर्भ निर्माण होतील व त्या रूपानें तूं अमर होऊन राहशील. व त्यायोगे तुला ब्रह्मदेव, मी व महादेव यांचें नित्य दर्शन होत जाईल. तुला सर्व लोक पवित्र मानतील. कुशदैत्यासाठी भगवतांनी मथुरा सोडून द्वारकेस वास केला आहे. गोमती संगमावर तैं चक्रतीर्थ सर्व लोकांना मोकळे केल्यावर भगवान् पुन्हा बळीकडे आले व त्याचे दास्यत्व करूं लागले. व