पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२रें. ] अध्याय ४ था. मग त्याच्या असे साहजिक त्या तीर्थात स्नान करण्याची इच्छा झाली, व तत्काल तो पुष्कराहून चक्रतीर्थाजवळ आला. तें रम्य तीर्थ पाहून दुर्वास ऋषीला मोठा आनंद झाला व तो मोठ्या उल्हासानें त्या तीर्थात स्नान करूं लागला. इतक्यांत त्या तीर्थाचे रक्षक कुशराक्षसाचे दूत दुर्वासाजवळ आले, व त्यांनी ऋषीला बाहेर ओढून काढून मारीत मारीत कुशराक्षसाजवळ नेलें. त्या दुष्ट राक्षसाने दुर्वासास अत्यंत छळलें व जिवंत सोडून दिले. दुर्वास ऋषीच्या मनांत त्यास शाप देऊन त्याला दग्ध करून टाकावें असें आलें होतें, परंतु त्यास शंकराचा वर असल्यामुळे दुर्वासऋषत्वास शाप न देतां परत आला. परंतु त्या दैत्याचा नाश करता करितां येईल याचा तो एकसारखा विचार करीत होता. लक्षांत आले की, भगवान् शेषशाई नारायणावांचून या कुशदैत्याचा नाश करण्यास कोणीहि समर्थ नाही. तेव्हां दुर्वास ऋषि नारायणाचा शोध करूं लागला. सर्व पृथ्वी, क्षीरसागर वगैरे ठिकाणी त्यानें भगवंताचा शोध केला, पण भगवान् कोठेंच दृष्टीस पडेना. तेव्हां दुर्वासऋषि वैकुंठास गेला, पण तेथेही (भगवान् वासुदेव दृष्टीस पडला नाहीं. मग त्याची व नारदाची मार्गात गांठ झाली. नारदानें भगवान् पाताळांत बळीचे सेवक होऊन राहिले आहेत असे सांगितले. मोठमोठ्या तापसी जनांना ज्या भगवंताचें दर्शनही होत नाहीं, तो भगवान् वासुदेव, केवळ बळी राजाचे भक्तीमुळे त्याचा चाकर होऊन राहिला आहे, हैं ऐकून दुर्वासाला फार आश्चर्य वाटले व तो लागलाच तेथून निघून पाता- ळांत गेला. त्यानें भगवंताचे चरणीं आपले मस्तक ठेविलें व तो भगवंताला ह्मणाला, " देवा ! चक्रतीर्थावर स्नान करण्यास गेलों असतां कुरा दैत्यानें माझी फार विटंबना केली; त्या दैत्याला महादेवाचा वर असल्यामुळे तो फारच उन्मत्त झाला आहे; तुझ्यावांचून त्याचा नाश करण्यास दुसरा कोणीही समर्थ नाहीं. तर हे नारायणा ! त्या राक्षसाचा नाश कर आणि तें चक्रतीर्थ सर्व पतिवांना मोकळें कर." दुर्वास ऋषीची ही विनंति ऐकून भगवान् वासु- देव हाणाले, " ऋषि ! तुमच्या विनंती प्रमाणें मीं यावें हें खरें, पण हल्ली भी बळीचा दास आहे. तेव्हां वळीच्या परवानगीवांचून मला येतां येणार नाही." मग दुर्वासऋषीने बळीची विनंति केली. तेव्हां वळी ह्मणाला, हे दुर्वासऋषे ! मी नारायणाला आपणापासून घटकाभरहि दूर करणार नाहीं. नारायणास घराचे बाहेर जो मूर्ख असेल तोच करील. दारापुढचा कल्पतरु जो वेडा असेल तोच काढून टाकील. नारायणाची योग्यता मी चांगली जाणतों, झणून मी देवाला आपणाजवळून दूर करण्यास मुळींच कबूल नाहीं. " हे बळीचे बोलणें ऐकून दुर्वास ऋषीची फारच निराशा झाली. मग देव बळीला ह्मणाले कीं, " लोकांच्या संकटाचें निवारण करून, दुष्टांचें हनन करणें, दें माझें कर्तव्य आहे; मी जर ऋषींचे कार्यासाठी गेलो नाहीं, तर माझे ब्रीदाला 66