पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ कथाकल्पतरु • अध्याय ४ था. [ स्तंबक १ कुशदैत्य व दुर्वास ऋषि. 66 जनमेजय राजा वैशंपायनाला ह्मणाला; श्रीकृष्णानें ती द्वारकानगरी एवढी मुंदर वसुंधरा सोडून समुद्रांत कां निर्माण केली तें ऐकण्याची इच्छा आहे. ते हां वैशंपायन ऋषि झणाले, राजा ! श्रीकृष्णांनी मथुरा, गोकुळ, वृंदावन या ठिकाणी जो कांहीं दिवस वास केला, तो वृंदावनाच्या एका स्त्रीचे सांग-- ण्यावरून केला. तेथें गोपिकांसह अनंत वर्षे क्रीडा केल्यावर श्रीकृष्णास मथु- रेचा कंटाळा आला होता; शिवाय वृंदेनें ज्याप्रमाणे मथुरेस कृष्णाचा वास करविला होता, त्याचप्रमाणें कुश राक्षसानें द्वारकेस श्रीकृष्णांनी वास करावा अशी कृष्णाची विनंती केली होती. आणि त्या स्थानावांचून संपूर्ण भूतलावर दुसरें पवित्र असें नगर बांधण्यासाठी स्थळहि नव्हतें. पृथ्वीवर भागीरथी नदीचे कांठी श्रीकाशीक्षेत्र ह्मणून एक पवित्र स्थान आहे, पण तेथें श्रीशंकराचा वास असल्यामुळे श्रीकृष्णांनी आपणासाठी स्वतंत्र अशी द्वारका नगरी तयार केली. कुशदैत्याचे सांगण्यावरून श्रीकृष्णांनी द्वारकेस कां वास केला तें तुला सांगतों. कुश हा मुर नांवाच्या असुराचा बंधु होता. त्यानें कित्येक वर्षे कडकडीत तप करून महादेवाला प्रसन्न केलें, व त्यांच्याकडून असा वर मिळविला कीं, संपूर्ण पृथ्वीवर जेथें जेथें सूर्याचे किरण जाऊन पोहोचतात त्या ठिकाणीं मला मृत्यु येऊं नये; तसेंच रणांत माझे हस्तपादादि अवयव तुटून पड ल्यास ते माझ्या धडास लावल्याबरोबर मी पुन्हा पूर्ववत बलवान् व्हावें. शंकरानें प्रसन्न होऊन त्यास वरीलप्रमाणें वरदान दिले व त्यास असे सांगितलें कीं, तूं चक्रतीर्थाचें संरक्षण कर. कारण या तीर्थाचा असा महिमा आहे की, या तीर्थात जो स्नान करील तो यमाला चुकवील. असें शंकराने सांगून ते अदृश्य झाले, व कुश तेव्हांपासून चक्रतीर्थांचं संरक्षण करूं लागला. कांहीं दिवस गेल्यावर पुष्कर तीर्थाचे ठिकाणी दुर्वास ऋषीची व नारदाची गांठ पडली; नारदाचें भ्रमण सर्व भूमंडळी असल्यामुळे त्यास सृष्टीतील अनंत चम- त्कार पहावयाला मिळत असत; ह्मणून जो तो नारदाला कांहीं नवी माहिती विचारीत असे. दुर्वास ऋषीनेंहि नवीन प्रकार आपणास सांगावा ह्मणून नारदाची विनंति केली; तेव्हां नारद हाणाला, ऋषि ! माझ्या अवलोकनांत नवीन असे चक्रतीर्थ ज्याला कुशस्थळही ह्मणतात, तें आलें आहे. त्या तीर्थाचा महिमा मोठा विलक्षण आहे. जो त्या तीर्थात स्नान करितो, त्याच्या संपूर्ण पातकांचा नाश होतो. तें तीर्थ गोमती नांवाची नदी सागराला ज्या ठिकाणी मिळते, त्या ठिकाणी आहे. अशी नारदाकडून चक्रतीर्थाची हकीकत ऐकल्यावर दुर्वास ऋषीला 66