पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय ३ रा. 2 भेट होईपर्यंत मला निद्रा मिळावी. त्याप्रमाणें इंद्राने मुचुकुंदास निद्रा दिली पण तुला जो त्रास देऊन उठवील त्याचा नाश होईल असे सांगितले." मुचुकुंदास याप्रमाणें बरदान होतें त्यामुळे काळयवनाचा नाश झाला, व मुचुकुंदास श्रीकृष्णाचे दर्शन होऊन मोक्ष मिळाला. तसेंच श्रीकृष्णाचेंहि पण युद्धावांचून काम झालं. ५ षडाननाची कथा. 66 लागला. नंतर वैशंपायन म्हणाले; राजा षडानन हा महादेवाचा पुत्र होय. तारकासुराचा मृत्यु महादेवाचे मुलाचे हातानें होता. तारकासुरानें अत्यंत प्रळय मांडल्यावर सगळे देव शंकरास पुत्रप्राप्तीची इच्छा करूं लागले, पण त्यावेळी महादेव व पार्वती यांच्यांत बेबनाव झालेला असल्यामुळे पुत्र होणें दुरा- पास्त आहे, असे सर्व देवांनां वाटलें. मग अग्नि त्या दोघांचा योग घडवून आणण्यासाठी पुढे झाला, व मोराचें रूप धारण करून महादेवापुढें नृत्य करूं त्या मोराचें तें सुंदर नृत्य पाहून शंकराला कामेच्छा उत्पन्न झाली, तेव्हां महादेघाचं रेत पृथ्वीवर स्वलन झालें. आपला कार्यभाग झाला असे पाहून (अग्नीनें आपढ़ें रूप धारण केलें व तं वीर्य घेऊन तो तेथून निघून गेला. नंतर पार्वती येऊन पाहूं लागली तो महादेवाचं कांहीं वीर्य पृथ्वीवर पडलेले आहे, तेव्हां तिच्या मनांत पृथ्वीविषयीं सवतीमत्सर उत्पन्न झाला व ती त्या पृथ्वीवर क्रुद्ध होऊन म्हणाली, "माझ्या पतीच्या वीर्याची मी एकटी मालकीण असून तो भाग तूं भोगलास म्हणून तुला अनंत राजे भोगतील; असा मी शाप देतें." हा शाष ऐकून पृथ्वी म्हणाली; “ हे देवी पार्वती ! तूं मला निष्कारण शाप दिल्या- मुळे मीहि तुला शाप देतें कीं, तुझ्या उदरीं रुद्रवीजापासून फलप्राप्ति होणार नाही." पृथ्वीच्या अंगावर त्या वेळीं जें वीर्य सांडलें त्यापासून सोनें, रूपें आदि सप्त धातु निर्माण झाले, अशी रामायणांत कथा आहे. अमि ब्राह्मणाचे वेषानें भिक्षेम आला असतां पार्वतीने त्यास त्या वीर्याची भिक्षा घातली; तें अमृत जाणून अग्नीनें भक्षण केलें, त्यामुळे तो गरोदर झाला, तेव्हां वाटेत अरुंधतीशिवाय सप्त ऋषींच्या सहा बायका सरोवरावर स्नान करीत होत्या ती संधी पाहून अग्नीनें त्यांच्या उदरांत आपला गर्भ घातला, त्यामुळे त्या स्त्रियांना गरोदरावस्थेची चिन्हें जाणवूं लागली. आपण गरोदर आहोत हे आपल्या पतीला कळल्यास मोठा अनर्थ होईल, असे जाणून सर्वजणींनी आपआपल्या गर्भाचें पतन केलें. ते सहा गर्भ एका ठिकाणी पडल्यावर त्यापासून सहा मुखांचें मूल निर्माण झालें. पुढे ते मूल नारदाने तेथून उचलून पार्वतीजवळ आणून दिलें, व तिला त्या- संबंधाची सर्व हकीकत सांगून तो मुलगा तुझाच आहे, अशी तिची खात्री करून दिली. शंकरपार्वतींनी त्याला सहा मुखें असल्यामुळे त्याचें षडानन असे नांव ठेविलें. याप्रमाणे षडाननाची उत्पत्ति असून त्यानें आपल्या पराक्रमानें तारका- सुराचा नाश केला. ७