पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक पीतांबर घालून आपण अदृश्य झाला. निजलेला मुचुकुंद हाच श्रीकृष्ण आहे असें पीतांबरामुळे काळयवनाला वाटले व त्यानें जोरानें एक लाथ मुचुकुंदास • मारली, त्याबरोबर त्याच्या नेत्रांतून भयंकर तेज निर्माण झालें, व त्यायोगे ती काळयवन भस्म होऊन गेला. मुचुकुंद त्या लत्ता प्रहारामुळे जागा झाला. व आपणास कोणी सावध केलें तें पाहूं लागला, परंतु जवळ कोणीहि नसून आपल्या अंगावर पीतांबर आहे याबद्दल त्याला फार आश्चर्य वाटलें. इतक्यांत त्यास आपल्या वरदानाची स्मृति झाली, व तो श्रीकृष्णानें स्तवन करूं लागला. तेव्हां शंखचक्रगदापद्यधारी श्रीकृष्णाची मूर्ति त्याच्या समोर उभी राहिली. याप्रमाणे श्रीकृष्णाचें दर्शन झाल्याबद्दल मुचुकुंदास फार आनंद झाला व त्यानें श्रीकृष्णाचे चरणावर मस्तक ठेवून त्यापासून आशीर्वाद मिळविला. कृष्णाने त्याच्या मस्तकावर हात ठेवून तूं मोक्ष पावशील असा वर दिला व नंतर श्रीकृष्ण तेथून द्वारकेस आला. कथाकल्पतरु. ४ मुचुकुंदाची कथा. जनमेजय राजा वैशंपायनाला ह्मणाला; " हे मुनिराज ! श्रीकृष्णानें द्वारकेची स्थापना कां केली हैं मला कळले; परंतु मुचुकुंदास लाथ मारल्यामुळे काळयव- • नाचा नाश कां झाला ते मला कृपा करून सांग" वैशम्पायन झणाला, “राजा ! सूर्य वंशांतील इक्ष्वाकु राजाचा मुलगा मांधाता, व त्याचा पुत्र मुचुकुंद हा होय. मुचुकुंद हा अयोध्येस राज्य करीत असतांना ब्रह्मदेवाचे वरप्रदानामुळे सर्वांना अजिंक्य झालेला तारकासूर सर्व त्रैलोक्यांत अत्यंत उत्पात करूं लागला. साट सहस्र वर्षेपर्यंत देव तारकामुराबरोबर युद्ध करीत होते, पण तारकासुर कोणासहि आटपेना. तेव्हां मुचुकुंद राजा रणविद्येत फार निपुण असल्यामुळे तो तारका- सुराचा सहज नाश करील, असे इंद्राला नारदानें सांगितल्यावर, इंद्राने विमान पाठवून मुचुकुंदास अमरावतीस आणिलें तेथें तारकासुराबरोबर मुचुकुंदराजा दोन युर्गेपर्यंत युद्ध करीत होता. पुढें षडाननानें त्या तारकासुराचा नादा केला " त्या वेळी इंद्र मुचुकुंदला हाणाला; " हे राजा ! तूं आमच्याकरितां दोन युगेपर्यंत तारकामुराबरोबर अहोरात्र युद्ध केले हे तुझे आमच्यावर फार उपकार झाले आहेत तर या उपकारऋणांतून सोडविण्यासाठी तुझी इच्छा असेल ते माग. मी देण्यास तयार आहे." मग मुचुकुंदानें इंद्राजवळ मोक्षदान मागितलें, "मोक्षदान देण्याची देण्याची आमची योग्यता नसून तशी शक्तीही आमच्या आंगी नाही, पण तूं मागितलें आहेस त्या अर्थी मी तुला असे वचन देतों की, द्वापारीं श्रीकृष्ण भगवान् तुला भेटेल त्याच्याकडून तुला मोक्षप्राप्ती होईल. तोपर्यंत तूं आपले अयोध्येच्या राज्याचा सुखानें उपभोग घे. " तेव्हां मुचुकुंद झणाला, " हे मुरनाथा! आतां राज्य करण्याची मला मुळीच इच्छा नाहीं. सतत दोन युगे युद्ध केल्यामुळे मी फार थकलों आहे तर श्रीकृष्ण भगवंताची