पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें. ] अध्याय ३ रा. ह्मणाला, " तो काळयंवन महा शक्तिसंपन्न असून त्याच्याजवळ पुष्कळ सैन्य आहे, तेव्हां मी एकटा त्याच्याबरोबर युद्ध करण्यास अगदी असमर्थ आहे. आतां तो चतुर आहे की नाहीं, हें पाहून मला पुढील तयारी केली पाहिजे. " असे सांगून श्रीकृष्णाने एका मातीच्या घागरीत एक मोठा सर्प घातला व त्या घागरीचें तोंड बांधून ती घागर दूताबरोबर काळयवनाकडे पाठवून दिली. काळयवनानें तो घट सोडला व त्यांत सर्प आहे असे पाहून त्या बागरींत लक्षावधी मुंग्या घालून पुन्हां त्या घटाचें तोंड बांधले व तो श्रीकृष्णाकडे परत पाठवून दिला. मग तो घट, श्रीकृष्णाने सोडून सर्वांना दाखविला तो सर्प मरून त्याचे अनंत तुकडे झाले होते, असे सर्वांच्या दृष्टोत्पत्तीस आलें. तेव्हां श्रीकृष्णाने काळयवनाबरोबर युद्ध करण्याचा विचार रहित केला. व एक निराळीच योजना केली. गरुडास विश्वकर्म्याकडे पाठवून त्यानें विश्वकर्म्याला बोलाविलें. व त्याला अगदी मथुरेप्रमाणेंच समुद्रांत द्वारका नगरी एका रात्रीत तयार करण्यास सांगि- तले. त्याप्रमाणे विश्वकर्म्याने द्वारका नगरी तयार केल्यावर श्रीकृष्णानें तो मजकूर फक्त बलरामाला सांगून रात्रीच्या रात्री सर्व लोक निद्रिस्थ असतांना त्यांच्या पशुपक्षी आदि वस्तूंसह द्वारकेस नेऊन टेविलें. सकाळी उजाडल्यावर लोक द्वारका- नगरीच्या बाहेर येऊन पाहतात तों, जिकडे तिकडे समुद्र दिसूं लागला. तो विलक्षण प्रकार पाहून लोकांना आतां जलप्रळय होत असून सर्व मथुरा पाण्यांत जाणार असे वाटू लागलें. लोक फार भयभीत झाले, माता आपल्या मुलांना हृदयाशी धरून बसल्या, जो तो अश्रुपात करूं लागला आणि सर्व लोक हाहा:कार करूं लागले. लोकांची ही चमत्कारिक अवस्था वलरामानें पाहून त्यानें सर्व लोकांनां श्रीकृष्णानें मथुरा द्वारकेला काळयवनाचे भीतीने आणली असे सांगितले. तेव्हां लोकांत शांतता झाली. लोक आपआपला पैसाअडका ऐवज, धान्याची पेवें, त्रुच पशु आदि सर्व जेथल्या तेथे आहे हे पाहून फार आश्चर्यचकित झाले व त्यांनी श्रीकृष्णाची अनन्य भावाने स्तुति केली. ३ कालयवनाचा नाश. इकडे मथुरेमध्यें श्रीकृष्ण रात्रभर एकटाच होता, तो प्रभातकाळ झाल्यावर नथुरेच्या बाहेर पडला व काळयवनाच्या सैन्यासमोरून मार्ग क्रमूं लागला. ती चतुर्भुज पीतांबर नेसलेली श्रीकृष्णाची मूर्ति पाहिल्याबरोबर काळयवनास जरा- संधाने सांगितलेला कृष्ण तो हाच अर्से वाटले व तो कृष्ण निःशस्त्र एकटा पायांनी चालत आहे, असें पाहून आपणही निःशस्त्र एकटा कृष्णाला धरण्याचा प्रयत्न करूं लागला. इकडे कृष्णानें धांवल्यासारखें करावें कांहीं चालल्यासारखें करावे, असें करून करून त्यानें काळयवनास पुष्कळ दूर नेले. याप्रमाणे सैन्यापासून कित्येक कोस लांच आणल्यावर एका गुहेत शिरला व तेथे मुचुकुंद नांवाचा एक राजा जवळच निद्रिस्थ होता, त्याच्या अंगावर श्रीकृष्णाने आपला