पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तवक जरासधानें मनांत आणले. हा काळयवन ऋषीच्या वरदानाने सर्वांना अजिंक्य झाला होता. पूर्वी गर्ग ऋषी एका वर्षे तपश्चर्या करीत बसले होते. कथाकल्पतरु. अरण्यामध्ये लोहपिष्ट खाऊन दहा हजार गर्गाचार्य हे यादवांचे जामात असून त्या वेळी त्यांची स्त्री ऐन तारुण्यांत होती; परंतु गर्गऋषींचें लक्ष तपश्चर्येकडे असल्यामुळे ते आपल्या तरुण स्त्रीकडे मुळींच पहात नसत. या त्यांच्या वृत्तीवरून यादव त्यांना हे पुरुष नाहीत असें ह्मणूं लागले. यादवांची ती निंदा ऐकून गर्गमुनींना फार राग आला, व त्यांनी बारा वर्षेपर्यंत शंकराची सेवा करून शंकरास प्रसन्न करून घेतले. आणि यादवांचा नाश करणारा पुत्र व्हावा असा वर मागून घेतला. शंकराकडून वर मिळविल्यावर गर्गमुनी घरी येत असतां त्यांनां यवन राजा भेटला. त्या राजाचें मोठं ऐश्वर्य होतें, परंतु पुत्र नसल्यामुळे तो अत्यंत कष्टी होता. त्यानें गर्गमुनीला साष्टांग नमस्कार घातला, व पुत्राची मागणी केली. ती त्याची विनंति ऐकून गर्गऋषींनी त्याच्या स्त्रीला मंत्राक्षता दिल्या. त्यायोगे त्या यवन राजाचे स्त्रीला पुत्र झाला. तो रंगानें काळा असल्यामुळे त्याचे नांव काळवचन असें ठेविलें. हाच कालयवन गर्गमुनीचा वरद पुत्र असल्यामुळे, त्याच्या हातून यादवांचा नाश होईल असा जरासंधास भरंवसा उत्पन्न झाला क झणून त्यानें काळयवनास बोलावून त्याला कृष्णाचे पारिपत्यासाठौ पाठविण्याची तजवीज केली. २ द्वारकेची स्थापना. जरासंध काळयवनाला ह्मणाला; " हे काळयवना ! त्या कृष्णाने माझा सत्रा वेळा पराभव करून मानभंग केला आहे; यादवांचा नाश तुझ्या हातून होईल असे तुला वरदान आहे, तेव्हां तूं मथुरेस जाऊन श्रीकृष्णाला मार. तो कृष्ण ओळख- ण्यासाठी त्याच्या मुख्य मुख्य खुणा तुला सांगतों. त्याचा वर्ण शाम असून त्याला चार हात आहेत. त्याच्या हातांत शंख, गदा, चक्र व कमळ अशी आयुधे आहेत, गळ्यांत कौस्तुभ मणी असून त्याचा मुकुट नवरत्नांचा आहे. त्याच्या i हातापायांचे तळवे रक्तकमळाप्रमाणे लाल आहेत, त्याच्या कमरेला नेहमी पिवळा पीतांवर असतो. तो मोठा चतुर असून शक्तिसंपन्न आहे. त्याचा तूं आपल्या बाहुवलाने पराभव करून ये." याप्रमाणे जरासंधानें काळयवनास सांगि- तल्यावर आळयवन आपणाबरोबर मोठे सैन्य घेऊन मथुरेस आला. काळयवनाचं ते प्रचंड सैन्य मथुरेवर आल्यावर नगरांतील लोक फार घाबरले. अगोदरच जरासंघाच्या सत्रा हल्ल्यांमुळे मथुरा नगरीची अगदीं दुर्दशा झाली होती, त्यांत आणखी हा काळयवन आल्यामुळे लोक अत्यंत भयभीत झाले. मग नगरांतील विकटु वगैरे प्रमुख लोक श्रीकृष्णाकडे आले, व त्याला हा अनर्थ टाळण्याची विनंति करूं लागले. विकद्रु ह्मणाला; " हे श्रीकृष्णा, तूं पूर्वी जसे या मथुरेचें सत्रा वेळा जरासंधापासून संरक्षण केले तसे आतांहि करावें." यावर श्रीकृष्ण