पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय २ रा. लंच आहे आणि आपले हाणूनच आह्नीं त्याचं रक्षण करूं. " त्या स्त्रीची ही विनंती श्रीकृष्णाने मान्य केली, व मृगालाचे मुलास मोठ्या समारंभानें सिंहासनावर बसवून आपण पुढें गोमाचल पर्वतावर निघून गेला. ३ गोमाचल विध्वंस. इकडे मथुरेवर जरासंध मोठ्या सैन्यानिशी चालून आला होता, पण श्रीकृष्ण व बलराम हे दोघेही मथुरा सोडून निघून गेल्याचे समजल्यावर तोही युद्ध बंद करून श्रीकृष्णाच्या शोधास निघाला आणि गोमाचल पर्वतावर श्रीकृष्ण व बलराम या दोघांना गांठले. त्यानें पर्वतासभांवतीं सैन्याचा वेदा घालून पर्वताचे पायथ्याशी अग्नि लावून दिला. त्यायोगे सर्व पर्वत पेटला. अग्नीच्या भयंकर ज्वाळांमुळे अनेक जीवजंतु मरूं लागले. पर्वताच्या शीला पर्वतापासून मोकळ्या होऊन खाली पडूं लागल्या. अशा प्रकारें सर्व बाजूंनी पर्वत पेटल्यावर श्रीकृष्ण व बलराम हे दोघेही काय करावें या विचारांत पडले. कारण, त्या वेळी त्यांच्याजवळ आयुधें कांहींच नव्हती. मग त्यांनी इंद्राकडे अवश्य त्या आयुधांची मागणी केली. इंद्राने तत्काल श्रीकृष्णाला ज्या आयुधांची जरूर होती ती पाठवून दिली. आयुर्वे हातांत आल्याबरोबर दोघांनीही पर्वतावरून उड्डाण केले व ते जरासंधाच्या सैन्यासमोर येऊन उत रले. चवताळलेला वाघ मेंढरांच्या कळपांत शिरला ह्मणजे त्या कळपाचा जसा विध्वंस करून टाकतो, त्याप्रमाणे बलराम-कृष्णानें जरासंधाच्या सैन्याचा 'थोड्याच वेळांत विध्वंस केला व शेवटी एकटा जरासंध जिवंत राहिला. ‘त्याच्या अंगावर बलराम आपलें मुसळ घेऊन धांवला तोंच आकाशवाणी झाली कीं, ' हे बलरामा ! याचा तूं वध करूं नकोस. अशी आकाशवाणी ऐकतांच बलरामानें जरासंधाला जिवंत सोडून दिलें. नंतर श्रीकृष्णाने सुद- र्शन चक्राच्या योगानें गोमाचल पर्वत सूर्याचे रथाला अडथळा करीत अस- ल्यामुळे त्याला भूमिगत केले. त्या पर्वताच्या पृष्ठभागाला तेव्हांपासून गोवें असे नांव पडले. पुढे राम व कृष्ण उभयतां मथुरेस परत आले. अध्याय ३ रा. १ कालयवनाची उत्पत्ति, मार्गाल अध्यायांत सांगितल्याप्रमाणे जरासंधाचा पराभव झाल्यावर, तो आपले राजधानीत परत आला, व पुन्हा श्रीकृष्णाचें पारिपत्य कसे करावयाचें याचा विचार करूं लागला. त्यावेळी यवनाचे नगरामध्ये काळयवन, या नांवाचा एक महापराक्रमी यवन राजा राज्य करीत होता. त्या काळयवनाचें साख घेण्याचे