पान:कथाली.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशी बागेत वा कुठेही सोडण्याचा प्रघात अलीकडेच सुरू झालाय. असे त्या दिलासाघराचे गृहस्थ सांगत होते. त्या आठवणीने रंजनाचे मन; शरीर थरथरले. ती अंथरुणात उठून बसली. घड्याळात सवयीने पाहिले. पहाटेचे चार वाजून गेले होते. माधव गाढ झोपला होता. ती बाहेर व्हरांड्यात आली. आकाशाकडे पाहत हात जोडले. कधीही न आठवलेल्या ईश्वराला विनवले. "बाबा रे तू आहेस की नाहीस हे तूच जाणे आणि असशील तर एक प्रार्थना. माझ्या आधी माझ्या माधवला ने. तो आघात सोसण्याचं बळ मी निश्चयाने गोळा केलंय."

७२ /कथाली