पान:कथाली.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तो लंगडा वार्ताहर इथवर आला होता, त्याने नजरेचे पाते लवण्यापूर्वीच आपले दोन्ही हात बेबीच्या पाठीवर ढालीसारखे पसरले.
 माधवरावांची गुप्ती त्या वार्ताहराच्या उजव्या हातात घुसून रक्ताची चिळकांडी उडाली. द्वारकाबाईच्या कपाळावर त्याचे शिंतोडे आले. पेटलेल्या नजरेनी त्यांनी आपल्या नवऱ्याकडे तुच्छतेने पाहिले. कुणालाबी काही कळायच्या आत ती गुप्ती त्यांनी सपकन् ओढून काढली आणि बाहेर जाण्यासाठी वळलेल्या आपल्या नवऱ्याच्या पाठीवर सपासप वार करू लागल्या...

५८ /कथाली