पान:कथाली.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराज पांडवांपेक्षाही बुद्धिमान होते तरीही त्यांना राज्याभिषेक नाही. मी राजकन्या म्हणून मी दिलेले पुत्र औरस? देहलालसा माझ्या मनात नव्हतीच का? हर्षश्वानंतरच्या दिवोदासाचा सहवास हवासा वाटला होता. पर त्याच्यासाठी मी औरस पुत्र देणारे एक साधन...!
 माझ्या अस्तित्वाचा अन्वयार्थ...?

त्या तिघी/४९