पान:कथाली.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नुकतीच उमलू लागलेली होती. कंचुकी गाठ बांधताना, अंगावरचे उत्तरीय सावरताना तिची होणारी धांदल पाहून ज्येष्ठ परिचारिका मंजिरीला खूप हसू येई.
 ...त्या दिवशी माधवी नुकतीच स्नान करून आली होती. मंजिरीने सुगंधी अंगराग, मुखरागाचे लेपन देऊन माधवीला ययाती महाराजाकडे आणले. इतक्यात ब्रह्मर्षी आल्याची वार्ता सेवकाने दिली. आपल्या कन्येला त्यांचे आशीर्वाद मिळावेत, या हेतूने महाराजांनी माधवीला जलपात्र घेऊन अतिथिगृहात जाण्याची आज्ञा दिली. अचानक एकाएकी वादळी वारे वाहू लागले. अतिथिगृहाची दारे बंद झाली. मृत्तिकापात्रातून ती जल देण्यासाठी ती ब्रह्मर्षांसमोर गेली. ब्रह्मषींनी डोळे उघडले. समोर, उत्फुल्ल होणारी अनाघ्रात कलिका...
 पापणी लवायच्या आत त्यांनी तिला जवळ ओढले. कटीची मेखला, उत्तरीय कंचुकी सारी वस्त्रे दूर करून तिच्या देहाशी तो पुरुष क्रीडा करीत होता. त्याची तृप्ती झाल्यावर त्याची नजर भूमीवर पडली. ती रक्तांकित झाली होती. त्याने तिला उठवून बसविले आणि तिच्या माथ्यावर हात ठेवून सांगितले. हे पूर्ण स्त्रीये तू निरंतर अनाघ्रात कुमारिकाच राहशील.

स्त्रियः पवित्रंमतुलंम्।
नैनं दुष्यन्ति कहिंचित्।।
मासि मासि रजोयसाम्।
दुष्कृतान्यपि कर्षति ॥१॥

 हे स्त्रिये स्त्रीत साठलेले मल... रज दर महिन्याला निघून जाते. तुझी संमोहिनी कधीच नष्ट होणार नाही. तू कुमारिकाच राहशील असे वरदान देऊन तो झपझप पावले टाकीत उत्तरेकडे निघून गेला. जाण्यापूर्वी पिताश्री ययाती महाराजांना हे सत्य सांगून गेला.
 त्या दिवशी संध्यासमयीची लालिमा भवताल व्यापीत होती. राजकन्या माधवी मल्लिका कुंजात हार गुंफित असताना एक मुनीमहोदाय राजप्रासादात प्रवेश करताना दिसले. आणि काही काळात माधवीला पिताश्रींनी बोलाविल्याचा संदेश घेऊन दासी मधुरिका आली.
 ते मुनी निवेदन करीत होते. 'महाराज, आपले परम मित्र पक्षीराज गरुड यांचा मी मित्र, मुनी गालव. मी एका महासंकटात आहे. आपण मला मुक्त करू शकाल असे आश्वासन नव्हे, तर ग्वाही मित्र गरुडाने दिली आहे. माझे गुरू विश्वामित्र

४६ /कथाली