पान:कथाली.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
'भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनो कुतः।'

 असे साधार सिद्ध करणारा. आणि म्हणून 'ऋणम् कृत्वा घृतं पिबेत्'...एकवेळ ऋण काढा पण देहांच्या... मनाच्या इच्छांची तृप्ती करा. तिच्या मनात आले, देह आणि मन यांचे वेगवेगळे अस्तित्व असते का? की एकात्म वगैरे? आत्मा-परमात्म्याचे एकरूपत्व आणि आत्म्याचे अमरत्व, विविध पद्धती, उदाहरणे यांतून सिद्ध करताना ईशानच्या मुखमंडलाभोवती तेजोवलय लहरत असल्याचा भास होई.

नैनं छिंदती शस्त्राणि नैनं दहति पावक

 देहपंचमहाभूतांच्या कणांतून आकारतो. आत्मा मात्र देहावेगळा असतो. मृत्यूनंतर देहातील पंचधातूचे भाग आप... तेज... वायू... मृद... अवकाश आपापल्या मूलस्थानी जातात.
 आत्मा मात्र दूर... दूर भरारतो. मग देहाच्या इच्छा, आकांक्षा, वासना...वेगळ्या का? त्यांचे अनुबंध देहाशी की आत्म्याशी की मनाशी? मन हे देह आणि आत्म्याशी कोणत्या नात्याने बांधलेले?...?
 शेषाचा बलदंड झळझळीत पितांबरी नग्न देह समोर उभा होता. त्याच्या डोळ्यांतून वासना ओसंडून ओघळत होती. काही उमगाय समजायच्या आत भानुमतीचा रसरशीत गौर देह शेषाचे क्रीडास्थान बनला.
 चुरगळलेल्या पारिजात कुसुमाप्रमाणे कोमेजून गेलेला भानुमतीचा देह आणि चुरगळून गेलेले उद्ध्वस्त मन. अनेक काटेरी प्रश्नांचे खंजीर तिच्या मनावर खुपसले जात होते.
 आत्मा एकच नां. स्त्री आणि पुरुषाचा? बळाचा वापर करून स्त्रीच्या देहावर आघात करणारा पुरुषाचा देह त्यातला आत्मा आणि आघात असहायपणे सोसणाऱ्या स्त्रीचा आत्मा. दोन्ही एकरूप की वेगळे? देहावर होणारे आघात निरंग होऊन सोसणारा देह 'स्त्री'चाच का? पुरुषाच्या वासना शमविण्यासाठीच तिचा देह? स्त्री-देह एक वस्तू? पुरुषाची क्रीडा-वास्तू?
 एकदा पौर्णिमेच्या रात्री ओले केस उदवत असतांना तिची प्रियतम सखी दासी मेघना सांगत होती, महाबली दुर्योधन पांचालीस एकटीला गाठून विचारीत असे...आज पाळी कोणाची? पांचाली खजील होऊन खाली मान घालून तटस्थ उभी

त्या तिघी/४१