पान:कथाली.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पावसाळ्यात माहेरी पोचवा नि उन्हाळ्यात आजोळी. थंडीत मात्र तुमच्याच जवळ... सासरी ठेवा हं !

'ऋत गर्मी में ब्याव रचायो।
खस का पंखा ल्याओ जी बन्ना।
खस का पंखा रसरी बिनणी।।
गेंदलासु गोद भराओ जी बन्ना ।

* * *

'...सियालामे सासरों, चौमासामें बायरो,
उनालामें नानेरों, पुगाओ जी बन्ना।'

 छलकन् जिजी गाणे म्हणत असे तर भंवरुनाईची मोठी बायको ढोलक वाजवी. ते वाजवता वाजवता जमलेल्या बायका अभिनय करीत. एक बने नवरा, तर दुसरी नवरी. मग छलकन् जिजी नटखट 'बन्नी' बनून जाई. शेवटी हसता हसता जिजीचे डोळे भरुन येत. अवघे रसदार गाणे छल्लोजिजीच्या डोळ्यांतून वाहू लागे.
 "जिजी उन्हाळ्यात आजोळी, पावसाळ्यात वडिलांच्या घरी पोचवा आणि थंडीच्या कडाक्यात मात्र सासरी राहू द्या, असे का ग म्हणते ग ती बन्नी?" मी प्रश्न विचारला होता. माझ्या गालावर चापट मारीत जिजीने सांगितले होते. "उन्हाळ्यात आंबे खायला आजोळी जायचे तर पावसाळ्यात सणांसाठी माहेर हवे. तिथे मनसोक्त हुंदडता येतं. मेंदी रचता येते आणि थंडीचा काटा घालवायचे तर सासरच हवं. खूपखूप काम केलं की थंडी पळून जाते गुडिया" असे म्हणताना डोळे मिचकावीत ती हसली होती. पण तरीही डोळे भरून आले होते.
 तसे पाहिजे तर छलकन् जिजी आमच्या गावची माहेरवाशीणच की. पुरुषांच्यात वावरायला तिला अटकाव नसे. छल्लोच्या कामसूपणामुळे आणि हाताच्या चवीमुळे धन्नूचाचाचे दुकान वाढले. सियालडुंग्यालाही एक दुकान टाकले. तिथले दुकान तो नि त्याचा मुलगा पाही. छलकन् जिजीमुळे लग्नकार्याची कामे मिळत. पैसा कुणाला नको असतो. तिचे गल्ल्यावर बसणे, सर्वांशी हसून बोलणे चाचाला चालत असे. मंझलीकाकी सुरुवातीला धुसफूस करी, पण तिच्याकडे लक्ष कोण देणार?
 अलीकडे मीही जग निरखायला शिकले होते. माझ्या लक्षात आले होते की जिजी तिच्या दोन बाकदार भिवईच्या मधोमध रक्तचंदनाचा टिका रेखते आणि

२६ /कथाली