पान:कथाली.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चाचाकडून हस्तगत केली होती. कालाजामून, मालपोवा, आलुचाट खावी तिच्याच हातची.
 मी तेरा-चवदाची असेन. मला बाबूजींनी जयपूरजवळच्या बनस्थळी महिला विद्यापीठात शिक्षणासाठी पाठवले. आठवीत गेले होते मी. पण तोपर्यंतच्या आणि नंतरही सुटीत मणिनगरला यायची तेव्हाच्या प्रत्येक आठवणीत छल्लोजीजी आहेच. ती मला गुडियाँ म्हणायची. मला नटवण्या सजवण्याचा केवढा शौक...नाद तिला! रंगीबेरंगी बुंदक्यांची महिरप माझ्या कपाळावर रेखून मधोमध सुरेख उभी कोयरी रेखण्याचा तिचा नेहमीचाच छंद. मला नवरी... बन्नी बनवून माझ्या चेहऱ्याकडे एकटक पाहत ती विवाहात गायची बन्नाबन्नीची, वारणा घेण्याची गाणी गुणगुणत राहील. तिच्या स्वच्छ आणि सुरेख कपाळावर मी, बिंदी... कुंकुम टिकली कधीच पाहिली नाही. एक प्रसंग मला छान आंठवतोय. माझ्या कपाळावर कुयरी रेखता रेखता तिने स्वतःच्या भाळावर उभा तिल्लक रेखला आणि धावत मंझजी काकीसमोर उभी राहून विचारू लागली.
 "ए बड्डी, देख तो ए! म्हानं तिल्लक ओपं कॉई?... मला हा तिलक शोभतो काग?"
 तिचा तो झगमगणारा लोभस चेहरा पाहून विजेचा झटका बसावा तशी मझलीकाकी पुढे आली आणि तो तिलक फरांटून काढला आणि स्वतःचे कपाळ बड़वीत रडू लागली.
 "अरी एऽऽ 'रांड! बडेराबुढा देख्या तो...? तुला नि मला दोघींना घराबाहेर काढतील. धून काढ ते थोबाड. पांढऱ्या पायाची रांड. माझ्या उरावर ओझं घालून सगळी मरून गेली. आता मलाबी खां."
 "अजून तर शहाणी व्हायचीय. द्येवानं रूप भरभरून ओतलंय, पण नशीब? परमेश्वरा ही वयात येण्याअगोदर मला तरी ने, नाही तर हिला तरी ने...!!"
 मंझली काकी छल्लोजिंजीला पोटाशी धरून रडत होती. तेव्हा मी असेन पाचसहाची तर छल्लो बारा-तेराची.
 आणि एक दिवस छल्लोजिजी आलीच नाही. मी न राहवून धन्नोचाचाकडे गेले. तेव्हा कळले की तिला शिवायचे नाही. "गुडियाँ थारी जिजी छिणाकी हुई है. बडी... सयानी हुई है. चार दिवसांनी येईल तुझ्याकडे ये. मी देऊका टिकीबिंदी

गेंदलासु गोद भराओ जी बन्ना / २३