पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

& दन शाक्त वाढीस लागेल, जुने अर्थशास्त्रवेते असें प्रतिपादितात कीं, व्यक्तिखातंत्र्य वाढविलें, व्यक्तिसुखाच्या कल्पना जोरावल्या म्हणजे राष्ट्रसामथ्र्य वाढतें.या प्रतिपादनांत उपयुक्ततेचा भाग इतकाच कीं,अशा कल्पना पूर्णतेस पावल्या-लोकांना धंदेशिक्षण मिळालें-म्हणजे देशाची उत्पादन शात वाढेल, प्रापंचिक जिनसांची विपुलता होईल व एकंदरींत सुख आणि समृद्धी वाढेल. येथपर्यंतची व्यातिस्वातंत्र्याची ही मजल सुखावह दिसली खरी; तरी तिची वाढ होतां होतां जीवनकलहाच्या प्रखर वाळवंटांत एकदां कां ती येऊन थडकली म्हणजे त्यांतील लोकोपकारक आर्द्रता केव्हांच जळून जाऊन प्रखर उन्हाची उष्णता तापवू लागते. इंग्रज मजुरांनीं सहकारितेचें जें एक साधन पत्करिलें, त्यांत व्यतिसुख सार्वजनिक सुखाच्या अंकित ठेविलें आहे. म्हणजे आपल्याकडे ' मी ? ही व्यात सर्वांच्या सुखाकरितां लीन असावी, सर्वजण तिच्या सुखाकरितां नसावेत, अशी जी एक सात्विक भावना आहे ती भावना सहकारितेंत सांठवलेली आहे हें निदर्शनास येतें. ह्या भावनेची जोपासना करण्याकरितां सहकारितेसारख्या लोकोपकारक उपायांचें चिंतन, मनन सर्वत्रांकडून करावलें पाहिजे. युरोपांत जेवढे सहकारी प्रयत्न झालेले आहेत तेवढ्याचा सुरम्य इतिहास त्यांच्या मनावर अनेक मागौनीं ठसविला पाहेजे. शिक्षणांत आपले लोक फार मागें राहिल्यानें त्यांच्या जाणिवेंत फार उणेपणा आहे. ही गोष्ट ध्यानांत घेऊन सहकारितेची एकच गोष्ट पुष्कळ पुष्कळ शब्दांत थोडी थोडी व पुन: g' निरानराळ्या दृष्टीनें तोचि ती सांगितली पाहिजे. वास्तविक थोड्या २° पुष्कळ माहिती सांगतां येईल पण नवा विषय समजावून धेण्याइतकी जाज्वल्य धारणाशाक्त सामान्य जनसमूहांत नसल्यानें तसें करणें निर* होईल. इंग्लंडांत सहकारिसंघानें अप्रबुद्ध शिशूवर्गाकरितां एक व ' लोकांकरितां दुसरा, असा दुहेरी शिक्षणाचा कार्यक्रम आपल्या पुढे ओं घेतला आहे. उल्फ सारख्या कसलेल्या लेखकानें हेंच धोरण लक्षांत वा" वून पतपेढ्यांचा तात्विक इतिहास रचित असतांना सामान्य लोकांकरिता छोटेखानी पुस्तकमाला लिहिण्याचा क्रम ठेविला आहे. या धोरणानुसार प्रस्तुत लेखकानें हा प्रयत्न केला आहे. औद्योगिक सहकारितेच्या দ্ববিদ্যু सांतील एक ठळक पान म्हणजे-सहकारी भांडार कसें उभारावें राक्*