पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

G खळगी भरण्याकरितां ज्यांना दोन आण्याची वर्गणी जमा करण्यास महतू प्रयास पडले, त्या इंग्रज मजुरांनीं आज मित्तीस शिक्षणउत्तेजनार्थ एक प्रचंड संघ निर्माण केला आहे. लोक जेव्हां दारिद्याच्या गाळांत कुजत असतात तेव्हां त्यांना प्रत्यक्ष भुकेशीं झगडावयाचें असल्यानें त्यांचें मानसिक दौर्बल्य वाढतें आणि असलें हें दौर्बल्य कसल्याही प्रकारच्या उन्नतीस अपायकारक आहे. १९ व्या शतकांतील इंग्रज मजुरांच्या परिस्थितीचा जो चित्रपट अांतील पानांत जसाचा तसा रंगविला आहे त्या वरून वरील विधानांस बळकटी येते. हा तिकडचा चित्रपट नजरे समेर असतांना आपल्याकडील परिस्थिती व तिकडची परिस्थिती यांत महदन्तर आहे असें सकृद्दर्शनीं जरी मनांत येऊं लागतें तरी दारिद्याचा शेणकाला सर्व देशांत सारखा सांचलेला असल्यानें अशा शेणखाईतून चित्तक्षेोभक चळवळीसारख्या विषारी वृश्चिकांचा उद्रव होऊं देण्यापेक्षां सहकारितेसारख्या पवित्र आत्मयज्ञाची वेदी सारवून काढण्याकडे तिजमधील शेणकाल्याचा कसा सदुपयोग करितां येईल हें ठळक रीतीनें लक्षांत यावें ह्यणून हा औद्योगिक क्रांतीचा इतिहास खुलाशानें निरूपण' केला आहे. चार्टिझम, कॅर्निलेंज, लुडाईटस वगैरेंच्या धामधुमीच्या वृत्तांतावरून तरी वाचकांनीं हाच बोध व्यावयाचा आहे. दारिद्यामुळे टीचभर गचाळ खुराड्यांत आपल्याकडील शहरांत हल्लीं लोकांची होत असलेली खेचाखेची, कंगाल परिस्थितीमुळे कौटुंबिक अगर गृहशिक्षणाचा होत असलेला -हास इत्यादि गोष्टी लोकशिक्षणास अत्यंत विघातक ठरत आहेत. तेव्हां त्यापासून निघणारा प्रश्न सहकारितेच्या द्वारां स्वावलंबनपर कसा सोडवावा, हें आपणास रॉकडेलसारख्या संस्थेच्या मनेोरम इतिहासावरून शिकतां येईल. 'लोकशिक्षणाचें ध्येय म्हणजे लोकांना अनुकरणीय नागरिक बनविणें व त्यांचें शील उदात्त करणें हें होय. नागरिकत्वाचें प्रमुख लक्षण म्हणजे प्रत्येकानें समाजांतील आपली उपयुक्तता वाढविणें हें होय. ह्या लक्षणानुसार औद्योगिक सहकारितेच्या प्रयत्नांत उद्योगधंद्यासंबंधीं जें सर्वांगसुंदर पण स्वयंभु शिक्षण मिळतें त्यावरून अशा सहकारी चळवळीचें पुराण आपल्या लोकांपुढे निरंतर वाचल्यास तें हितप्रदच होणार आहे. सहकारितेमुळे धंदेशिक्षणाचा प्रश्न आपोआप सोपा होऊन आपल्या लोकांची उत्पा