पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

W9 डेलचें अनुकरण कसें करावें, वाढत्या महागाईत संसारांत पुरवणूक शक्य तितक्या रीतीनें कशी पाडून घ्यावी.--वगैरे लोकांना सरळ साध्या भाषेत वांचून दाखविण्याचा येथें प्रयत्न झाला आहे. वास्तविक देशाची उत्पादन शात वाढविण्याकरतां सहकारितेचीं सर्व अंगें आपल्या लोकांस माहीत पाहिजे आहेत. आणि त्या धोरणानें * सहकारिता आणि शेती '; ' सहकारिता आणि उत्पादक धंदे '; ' सहकारिता आणि शिक्षण '; ' पतपेढ्या ? वगैरे अनेकविध माहितीचीं छोटीं पुस्तकें हे तयार करीत आहेत. Rìqiti Continuation Schools—rfąī52T व्यापारी, मजुर, शेतकरी वगैरे लोकांच्या मुलांकरितां शिक्षणात्मक संस्था आहेत. वरील वर्गातील लोक किंवा त्यांचीं मुलें आपापले धंदे करून आल्यानंतर रात्री अशा शाळेत आपल्या धंद्यास अनुकूल आणि नागरिकत्वास साजेशा विषयाचें शिक्षण मिळवीत असतात. असे वर्ग जर आपल्याकडे, इंग्लंडमध्यें टोनबी हॉल्सला वाहून घेतलेल्या विद्वान तपस्व्याप्रमाणें कोणी शिक्षण कामास वाहून घेणारे काढतील, इंग्लंडमधील माजी खिश्चन सोशियालिस्टाप्रमाणें गोरगरिबांना उत्पादक धंदे चालवितां येण्यास शिकविण्यास Union Club5 काढतील तर अशी पुस्तकमाला तेथें वाचण्यास अत्यंत उपयुक्त ठरेल. लेप्झिक येथील शाळाधिकारी Osker Pache ह्यांनीं रात्रीच्या बैठका भरवण्याचा नवीन उपक्रम केला आहे. या बैठकांत निव्वळ गप्पा गंजिफांचे आखाडे नसून मजूर व धंदेवाले किंवा अनेक गोरगरिब यांना आयुष्यक्रमांतील उदात्त भाग गमती गमतीनें सांगण्याची सुरवात केली आहे. आपल्याकडील गांवोगांव चावड्या व देवळे यांचा असा उपयोग करून घेतां येईल. या टिकाणीं अशा उपयुक्त विषयांचें ज्ञान करून देतां येईल, पेंच साहेबांनीं थोर थोर लोकांच्या जयंत्या, राष्ट्रीय महोत्सव वगैरे उत्साहजनक प्रसंगांचा या कामाकडे उपयोग करून घेतला आहे. गांवगन्ना असे किती तरी प्रसंग आपणास उपयोगी करून घेतां येतील. या शिवाय सार्वजनिक वाचनालयें व प्रत्येक शिक्षणसंस्था अशा ठिकाणीं अशा पुस्तकांची संख्या वाढती असला पाहिजे. सारांश, लोकांच्या प्रयत्नानें व पुस्तकांच्या साहाय्यानें सहकारितेचें शिक्षण देणा-या मंडळ्या देशभर निर्माण होतील तर ओवेनच्या शब्दांत बोलावयाचें म्हणजे