पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० पैशावरच सुरुवात केली; दुस-या ठिकाणीं अवघे १६ जणांनीं कामास हात घातला होता. रॉकडेलचें उदाहरण जगप्रसिद्ध आहेच. इतका हा सहकारी प्रयन्नाचा सोपा उपाय आहे. ७२. आपल्याकडे दरिद्री लोकांचा भरणा शेतक-यांत जास्त गांव कोठा का- आहे. यांच्या करतां सहकारितेच्या मदतीनें ढण्यास लायख कोणकोणते उपाय योजले पाहिजेत. याचें विवेम्हणजे शेतकरी. चन दुस-या एका ठिकाणीं होणारच आहे; पण खेडेगांवांत सहकारी कोठ्याची उभारणी करणें, हा एक उपाय येथे सांगण्या सारखा आहे. आपल्या शेतक-या जवळ भांडवल नसत्यामुळे तो अव्वल पासून अखेर पर्यंत सावकाराच्या पेंचांत सांपडतो. बींबियाण्यापासून सावकाराच्या पैशानें सर्व गोष्टी चालत असल्यानें पीक उभे राहतांच सावकारास तारण लावून द्यावें लागतें. सावकार अर्थातच शक्य तितक्या कसोशीनें आडवून व भाव पाडून पीक घरीं वाहून नेतो. दुसरा एखादा अडलेली शेतकरी आपलें पीक गाड्यांत भरून बाजार पेठेत आणतो, दलाल मग तें पैशाच्या अभावी पेठेतील व्यापा-यांस विकतो व आला पैसा दस्तुरी शेतक-याच्या ह- कापून घेऊन शेतक-यांच्या पदरांत टाकतो. यांत जर अडचणी. अशी मौज होतें कीं, दलालाच्या अगर अडत्याच्या वखारींत गांवोगांवचा माल हरहमेश येऊन पडत असल्यानें तेथें चढाओढीस प्रारंभ होऊन भावाची सारखी कुतर ओढ होत असते. अडत्यांचा बेफिकिरपणा सारखा वाढत असतो. अखेरीस गरजू शेतकरी जेरीस येऊन मिळतील तेवढे दाम घेऊन हवालदीलपणें परत फिरतो. मोळीविके, गवताचे भरेवाले, खेडेगांवचे दूधवाले, गवरीवाल्या बाया, मंडईत माळवीं आणणारे, लोण्याच्या पाट्या वाहणारे मावळे, यांचे बाजारांत गि-हाईक कोण हाल करीत असतें, यांची फसवणूक व त्यामुळे नेहमीं नागवणूक किती होते, याची