पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ १ थेंचें थेंबे तळे पुढची पायरी. आपला बाजार जर गेल्या वर्षी सांचे. दाणे आळींत दिवसा दोन दिवसाआड होत असे तर आतां सबंध वर्षीच्या बेगमी करतां भर पेठंत-नानाच्या पेठेतआपणास खरेदी करतां जावें लागेल. जळण एकदम भर गाड्या तळावरून आणतां येईल; वखे प्रावणें मागावरून ह्मणा किंवा सट्यानें ह्मणा विकत घेतां येतील. अशा धोरणानें आपली बचत विशेष होणार आहे.ती इतकी कीं,जर आपण आपला निश्चय कसोटला लावला तर आपणां २८ जणांपैकीं, एकास बाकीच्यांच्या प्रपंचाच्या जिनसा पुरविण्याकरितां एक लहानसें दुकानच काढतां येईल. या दुकानांत माल मूळ किमतीइतका स्वस्त-ह्मणजे खर्चवेंच घालून ज्या मोलानें तो पडला त्या किंमतीस तो मिळू लागेल. तो निर्भेळ व खात्रीचा मिळेल. त्यांत वाण्याउदम्यांच्या नफ्याची कड आपणास लागणार नाहीं. आपल्या फाटक्या संसारास पुरवठा येईल. ही शिंक्यावरची हांडी नव्हे. हा कांचेचा हारा नव्हे; हा भक्तीचा, हा भावाचा, हा प्रेमपुरस्सर सहाय्याचा प्रश्न आहे.” युक्ति तर निघाली. पण ती फलदूप कशी झाली तें पुढें पाहूं.