पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R आलेत राहणार ! बापडे हिंदुस्थानवासी तर हा सर्व प्रकार पाहून भांबुवृन गेले. यांचीं पेवें हंगामावर भरेनाशीं झालीं. बाहर सावकार तर ताड बाहेर काढू देईनात. पुन: नवीन स्थितीची पूर्ण ओळख करून घेण्याइतकें शिक्षणही त्यांना मिळालें नव्हतें व अजूनही नाहीं. सरकारानें यांच्या मदतीस येऊन कांहीं कायदे केले; पण अफाट समुद्रांत ज्याप्रमाणें एखादा मधुबिंदु टाकल्यानें फरक होत नाहीं त्याप्रमाणेंच बहुतांशीं त्या याप्रमाणें हताश झालेल्या आपल्या बांधवांची अल्प तरी सेवा करण्याच्या इराद्यानें कांहीं उदार आंत्मे आजमितीस पुढे आले आहेत, ही अत्यंत समाधानाची व आशाजनक गोष्ट आहे. वास्तविक पाहतां पाश्चात्य देशांत ह्यासंबंधीं खटपट करणा-या लोकांपुढे इकडील लोकांचें तेज फिके पडतें. तथापि फूल ना फुलाची पाकळी ह्या न्यायानें हीही त्यांची खटपट ईश्वरासमेर रुजूच होईल. ‘ घनिकांचे सानिध्यांत गरिबांचें दारिद्य जास्त भीषण व दुःखप्रद होऊ लागतें. अशा वेळीं वाढत्या दारिद्याची लाट मार्गे खेचून धरण्याकरितां सर्व जगभर प्रचंड अट्टहास चाललेला आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांचेकरितां अनेक वेळां अनेक ठिकाणीं रणें माजलीं, क्रांत्या झाल्या, पण उपयोग झाला नाहीं. जेथें महान् महान् धन्वंत-यांच्या जाज्वल्य औषधांचीही मात्रा चालत नाहीं तेथें यःकश्चित् बायाबापड्यांच्या व्यावहारिक तोडग्यांनीं अति उपयुक्त कामगिरी करून दाखविल्याचा अनुभव प्रपंचांत आपणांस नेहमों येतोच. या न्यायास अनुसरूनच इंग्लंडांत लँकेशायर परगण्यांत रॉक नदीच्या कांठीं दहापांच कंगाल कोट्यांनीं आपल्या संसाराचा बोजा हलका करण्याकरितां १८४४ सालीं एकमेकांच्या हातांत हात दिला. एकादशी, शिवरात्रीच्या दिवशीं देवाच्या द्वारीं पुष्कळ कंगाल लोक एक सुरानें हेल काढीत हातांत हात घालून सहकार्य करीत असतात. पण रॉकडेल गांवच्या कंगाल विणक-यांच्या सहकार्यांत एक अपूर्व तेज सांठवलें होतें. आत्मविश्वासांत जें दिव्य तेज सांठवलेलें असतें त्याचें ओजस्वी कवच्च त्यांनीं °ापल्या मळक्या कपड्याआड धारण केलें होतें. रॉकडेलच्या कोष्ट्यांनीं