पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ܖܓ݁ܳܐܰ24݂ܦܼܓ चतुःसीमांचें निसर्गदेवताच संरक्षण करण्यास सज्ज झाल्यानें तिजवर पूर्णपणें विश्वासून हिंदुस्थानदेश गेलीं कियेक शतकें स्वस्थ चितानें अनेक बाजूंनीं निद्रासुखांत मम्र झालेला होता. त्या अवधींत त्यावर परचक्रॅ आलीं नाहींत असें नाहीं, व कित्येक अंतस्थ राज्यक्रांत्याही घडल्या. पण दैनिक व्यवहाराची किंवा पोटापाण्याची त्याला कधींही विवंचना पडली नाही, ख्रिस्ती शकाचे पंधरावे शतकाचे आरंभीं जगाच्या एका भागांत एक क्रांति घडून येत होती. तिचा परिणाम उगमाच्या ठिकाणच्या लोकांस सुद्धां आरंभीं कळून आला नाहीं; पण दोन तीनशें वर्षांचे अवधींत तिनें जगांतील सर्व देशांत खळबळ करून सोडली. ज्यांची झोंप हलकी ते लवकर सावध झाले व खडबडून उठून आपल्या उद्योगासही लागले. कांहींना हालवून जागे करावे लागले व कांहींना तर अजूनही हादरवून धोके देऊन जागे करावे लागत आहे. बिचा-या हिंदुस्थानची अवस्था या दुस-या कोटींत आली आहे. नैतिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय अशा अनेक कारणांनीं येथील लोकांची मनःप्रवृत्ति एका विशिष्ट प्रकाशची बनली होती. सुमार एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीं याचा परिणाम असा दिसू लागला कीं, स्वत:- पलीकडे बहुजन समाजाची दृष्टी जाईनाशी झाली व तीही स्वार्थी बुद्धी ब-याच खालच्या पायरीची बनली होती. हिंदुस्थानवासी लोक म्हणजे एका èžqąfri tiga F4 [q:Hiờf an aristocracy of beggars HsèsỆğa sक्षेक-याच्या स्थितीस येऊन पोहोंचले होते. इकडे जगामध्यें होऊ घातलेल्या मन्वन्तरांत संपत्तीस विशेष मान मिळू लागला, व त्याचें पर्यवसान तूर्त तरी तिजला देव पदाप्रत आणून ठेवण्यांत झालें आहे. पैशाकरितां व्यापार व व्यापाराकारतां जगभर धिंगाणा अशी परंपरा उत्पन्न झाली आहे. या परिस्थितींतून एकटा हिंदुस्थान कस