पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

乱 स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवीत असतांना आपल्या राष्ट्राचाही प्रश्न सोडवून दाखविला आहे. इतकेंच नव्हे तर रॉकडेलच्या क्षुद्र प्रयत्नाचा अवलंब आज मित्तीस जगांतील सर्व राष्ट्रांनीं केला आहे. याच सुमारास म्हणजे सन १८४८ सालीं जर्मनींत दोन उदारचरित भूतदयेनें कळवळून गोरगरिबांच्या उद्धाराकरितां पुढें आले. श्रीमंतांनीं आपल्या जादा वित्ताचें साहाय्य गरजूं गोरगरिबांस देऊन त्यांच्या करामतीवर तें दामदुप्पट करविणें म्हणजे सपात, खाऊन पिऊन फस्त करण्याऐवजीं, पेरून भरपकि काढून घेणें होय, हें अर्थशास्त्रांतील तत्व ओळखून त्यांनीं देशांत एका अध्य ठिकाणीं सांचलेले संपतिचे ढिगारे समतेनें पसरवून सर्वतोपयोगी करण्याचा उपाय काढिला. असे हे उपाय आहेत तरी काय ? ह्या उपायांस सहकारिता म्हणतात. युरोपमध्यें निरानराळ्या देशांत निरनिराळ्या मार्गानीं या उपायाचा अवलंब झाला आहे. जर्मनीनें या उपायाच्या जोरावर आपले मोडकळलेले उद्योगधंदे सांवरले आहेत. पंगू आयर्लदनें आपल्या देशांतील शेतीभाती याच उपायानें वैभवास चढविली आहे. डेन्मार्क, स्वीडनसारख्या लहानग्या देशांनीं सुद्धां याच उपायानें आपल्या शेतीस औद्योगिक उत्क्रांतीचें स्वरूप आणून दिलें आहे. मग असा हा कल्पदुम आपल्यास नाहीं कां मिळवितां येणार ? येईल ! तो मिळवितां येईल व आपणांस तो हवाही आहे. आपल्या ग्रामसंस्थेंत सहकारितेची ओळख सांठविली आहे. पण ही संस्था आज लुलीखुळी झाली आहे. ती उभी करण्यास आज आपणास सहकारितेच्याच जिन्यानें गेलें पाहिजे. आपल्याकडे शेंकडा ८० लोक शेतकरी आहेत. त्यांची अवस्था अत्यंत कंगाल आहे. त्यांची शेतीची पद्धत जुनाट असून निव्वळ पोटमारा वाढवीत आहे. शिवाय मुंबई, कलकत्ता वगैरे ठिकाणीं यांत्रिक युगानें आपला अम्मल बसावला असल्यानें सहकारतेसारण्ख्या उपायाचे सवौगानें आपणांस अनुकरण केलें पाहिजे. आजचा काळ कांहीं तरी विधायक कृति करण्याचा आहे. हवालदीलपणें दोष काढीत बसण्याचा नाहीं. प्रथमावेगाच्या भरांत दोषाविष्करण होऊन गेलें आहे. आज उपायचिंतनाचा काळ आहे. अनेक उपायांत सहकारितेचा उपाय आपणाला अजमावून पाहण्या