पान:ओळख (Olakh).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गेलेले आहेत हे मात्र दिसते. प्रा. पाटणकर ह्यांच्या लेखनाचे स्वरूप फुटकळ लेखसंग्रहाचे नसून सुरचित अशा ग्रंधाचे आहे. दुसरा महत्त्वाचा फरक असा की, मकर सौंदर्य या कल्पनेची व्याख्या प्रथम करतात आणि त्या व्याख्येच्या आधारे कलामीमांसेला प्रयुक्त होतात. सौंदर्य म्हणजे काय या प्रश्नाला मतेकरांच्या विवेचनात गाभ्याचे स्थान आहे. तसे ते पाटणकरांच्या मीमांसेत नाही. तिसरा महत्वाचा फरक असा की, मकरांनी कलामीमांसेतील प्रश्नाचे स्वरूप फार सोपे गहीत धरले आहे. पाटणकरांना या क्षेत्रातील गतागतीची त्यामानाने अधिक जाणीव आहे. या ठिकाणी पाटणकर आणि मढेकर या दोघांची विवे बने मुद्दामच समोरासमोर ठेवलेली आहेत. कारण मराठीपुरता विचार करायचा तर मराठी कलामीमांसेत गेली सुमारे वीस वर्षे मढेकरांचा ग्रंथ आणि त्यांचे विवेचन याला जवळपास मध्यवर्ती स्थान आलेले आहे. मढेकरांचे विवेचन डोळयांसमोर ठेवून त्यांच्या विवेचनाची तपासणी करीत तिच्यातील दुबळया जागा दाखवीतच मराठीतील कलामीमांसा आपला प्रपंच थाटीत आहे. मढेकरांच्या विवेचनाच्या तपासणीला प्राधान्य देऊन बहुतेकांनी आपला मतभेद असेल त्या ठिकाणी स्वतःचे विचार विवेचकांच्या समोर ठेवलेले आहेत. मराठी कलासमीक्षेत मढेकरांच्या विवेचनाला यामुळे एका वीजग्रंथाचे स्वरूप आलेले आहे. प्रा. पाटणकरांचे विवेचन मर्टेकरापेक्षा अधिक खोलात उतरणारे आहे. त्यांच्या विवेचनाचा व्याप आणि आवाकाही मोठा आहे. पण तरीही ते मर्डेकरांच्या विवेचनाप्रमाणे पुढच्या कलासमीक्षेचे वीज ठरलेच अशी खात्री देता येत नाही. मढेकरांनी आपले विवेचन मांडले त्यावेळी विवेचन इतके अपरिचित वाटत होते आणि नवे वाटत होते की, त्याचा दबदबा आवश्यकतेपेक्षा किती तरी जास्त वाटत असे. कोणत्याही मुद्यावाबत फारसे खोलात न जाता मढे कर प्रश्नांचे स्वरूप अत्यंत सोपे करून टाकीत आहेत ही गोष्ट त्यावेळी फारशी काणाला जाणवली नाही. मढेकरांमुळे का होईना पण तात्त्विक कलासमीक्षा आता मराठी वाचकांना अगदीच अपरिचित राहिलेली नाही आणि या क्षेत्रातील गतागंत क्रमाने एकेकाच्या लक्षात येत असल्यामुळे एखादे नवीन विवेचन मध्यवर्ती समजून त्या अनरोधाने इतर विवेचक आपले विवेचन करतील अशी खात्रीही बाळगता येत नाही. नवीन येणा-या नंतरच्या विवेचकांची ही सर्व क्षेत्रांतील अडचण असते. अधिक मोठा व्याप अधिक मोठया खोलात जाऊन चर्चा हे दोन्ही गण मान्य केले तरी त्याला अधिक मोठी मान्यता मिळेलच अशी खात्री नसते. पाटणकरांच्या विवेचनाबाबत अजूनही एक अडचण आहे. मकरांचे विवेचन कसेही असले तरी निरनिराळ्या प्रश्नांबाबत निश्चित शब्दांत मत देण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. अशी निश्चित भाषेत मते असली म्हणजे ती मतभेद दाखविण्यासाठी सुद्धा बरीचशी सोयीची असतात. निश्चित

८९.

ओळख