पान:ओळख (Olakh).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मते निश्चितपणे स्वीकारता अगर नाकरता येतात. प्रा. पाटणकरांनी आपल्या विवेचनात अशी सोय ठेवलेली नाही. त्यांची भूमिका पुरेशी गंतागंतीची आहे; म्हणन ती भमिका निश्चितपणे स्वीकारणे अगर नाकारणे वाटते तितके सोपे नाही. कलासमीक्षेचे क्षेत्र हे क्षेत्रच असे आहे की ज्या क्षेत्रात एखादी भमिका निर्णायक सर्वमान्य आणि अंतिम अशी असू शकणार नाही. म्हणून पाटणकरांनी दिलेली उत्तरे हीसुद्धा ह्या क्षेत्रातील प्रश्नांची गुंतागत प्रश्नांच्या पोटात अंतर्भूत असणान्या गृहीत भूमिका आणि त्यांचा परस्पर अनुबंध यांचे जरी एक सुस्पष्ट चित्र आपणासमोर उभे राहिले तरी ते काम महत्त्वाचे म्हटले पाहिजे. पाटणकरांनी हे कार्य तर केलेच आहे पण त्याबरोबरच विचार करण्यासाठी नव्या महत्त्वाच्या दिशाहो दाखवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या ग्रंथाचे मोल अधिकच वाढलेले आहे.
 ज्या कलामीमांसेचा आपण विचार करतो आहोत त्या क्षेत्रात आपल्या आधीच्या विचारवंतांनी फार मोठे चिंतन उपलब्ध करून दिले आहे, त्याचा मराठी वाचकांना परिचयही करून दिला पाहिजे, आणि त्या चिंतनाची दुहेरी तपासणी केली पाहिजे ही बाब पाटणकरांनी आवश्यक मानली. एक तर विविध विचारवंतांच्या भूमिकांची एक परंपरा असते. त्या परंपरांतील विचारवंतांचा परस्परांशी संबंध असतो आणि प्रत्येक महत्त्वाच्या विचारवंताला काही वेगळे म्हणायचे असेल त्यामुळे इतरांपेक्षा त्याच्या विवेचनात काही फरकही असतो. कांट आणि हेगेल यांचा विचार एका परंपरेचे विचारवंत म्हणून करणे जसे आवश्यक असते तसा प्रत्येकाच्या भूमिकेतील फरक माहिती असणेही आवश्यक असते. मराठीतील कलासमीक्षा समद्ध व्हायची असेल तर असल्या प्रकारच्या परिचयांची आवश्यकता आहे; पण त्याबरोबर प्रत्येक विचारवंताच्या भूमिकेची ग्राह्याग्राह्यता तपासणेही आवश्यक आहे. पाटणकरांनी कलासमीक्षकांचा स्थलमानाने दोन गटांत विभागणी केलेली आहे. त्यातील पहिला गट अलौकिकतावाद्यांचा आहे. दुसरा गट लौकिकतावाद्यांचा आहे. या दोन्ही गटांतील विचारवंतांचा सविस्तर परिचय आणि त्यांच्या भूमिकांची तपासणी ह्यानिमित्ताने एकीकडे कांट, हेगेल, कोचे, कॉलिंगवुड इत्यादी विचारवंत आणि दुसरीकडे रिचर्डस्, ड्युई, स्पेन्सर, मार्क्स, फ्राईड, स्टॉलस्टाय इत्यादी विचारवंत यांच्या भूमिकांचा या ग्रंथात तपशिलाने परिचय आलेला आहे. या विचारवंतांच्या भूमिकांची तपासणीही सूक्ष्मपणे करण्यात आली आहे. पाश्चात्त्य विचारवंतांचा आढावा घेताना प्लेटो आणि अॅरिस्टॉटल यांचा विसर कुणाला पडतच नाही, त्यामुळे त्यांचाही आढावा आहे.

पण असे विवेचन करताना पुष्कळदा भारतीय परंपरेतही कलांच्या

ओळख

९०