पान:ओळख (Olakh).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाटणकरांची सौंदर्यमीमांसा


प्रा. रा. भा. पाटणकर यांच्या सौंदर्यमीमांसा या पुस्तकामुळे मराठीतील कला-समीक्षाविषयक विवेचनात एक नवीन आणि महत्त्वपूर्ण भर पडली आहे, याविपयी कुणाचेच दुमत होणार नाही. स्वत: लेखकालासुद्धा आपण मराठीतील कलामीमांसाविषयक विवेचनात महत्त्वाची भर घालीत आहो याची जाणीव असलेली दिसते. कै. मकरांच्या पुस्तकानंतर जवळजवळ वीस वर्षांनी या क्षेत्रात एवढे महत्त्वाचे असे सलग विवेचन उपलब्ध होत आहे असे म्हणायला हरकत नाही. मढेकरांच्या सौंदर्य आणि साहित्य' या ग्रथापेक्षा ' सौंदर्यमीमांसे' चे स्वरूप अनेक वावतींत निराळे आहे. कै. मढेकरांनी कलामीमांसेचा तपशिलवार विवेचन करणारा एखादा सांगोपांग ग्रंथ लिहिण्यास घेतलेला नव्हता. त्यांनी वेळोवेळी जे लेख लिहलेले होते तेच — सौंदर्य आणि साहित्य' नावाने एकत्र आलेले आहेत. अशा प्रकारे लेख एकत्र केले आणि ते दीर्घकालखंडात लिहिलेले असले म्हणजे त्यात दोन दोप निर्माण होत असतात. एक तर, अनेक मुद्दे- ज्यांचा परिपूर्ण विवेचनाशी सबंध आहे त्यांची चर्चा राहूनच जाते. दुसरे म्हणजे काही प्रश्नांची चर्चा पुनरुक्त होते. मढेकरांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय यात आहे की, दीर्घ कालखंडात त्यांनी ते लेख लिहिलेले असूनसुद्धा त्यांच्या लिखाणात फारशी पुनरुक्ती नाही. कलामीमांसेत फारसा विसंवादही नाही. पण अनेक मुद्दे या विवेचनात यायचे राहून
१. रा. भा. पाटणकर, सौंदर्यमीमांसा, इस्थेटिक्स सोसायटी-३५रु. रु.

मौज, ७४,

पृ. ५५२ किं.३५रु.

ओळख

८८