पान:ओळख (Olakh).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांच्या संशोधनातील एक महत्त्वाचा मद्दा यामळे वाद होतो. मागच्या अभ्यासकांचे अनेक निष्कर्ष समर्थित करणान्या, बाद करणाऱ्या टीपा अशा विवेचक अनवादाचे भूषण असतात. त्यामानाने कंगले यांच्या टीपा मागच्या अभ्यासकाने उपस्थित केलेल्या फार थोडया विवाद्य मद्यांना स्पर्श करतात असे म्हणणे भाग आहे.
 कधी कधी तर त्यांच्या भमिका निष्कारण आत्मविरोधी जातात. ६-१६ हा श्लोक क्षेपक असावा असे कंगले यांचे मत आहे. कारण या श्लोकावर अभिनवगुप्ताची टीका नाही. पण हा श्लोक नाट्यशास्त्राच्या सर्व प्रतींमध्ये सापडतो. ६-७९ या श्लोकांवरसुद्धा अभिनवगप्ताची टीप नाही. आणि हाही श्लोक सर्व हस्तलिखितांत सापडतो पण तो कंगले यांना क्षेपक वाटत नाही. घटना एकच. ती म्हणजे अभिनवगुप्तांनी टीका केलेली नाही पण सर्व प्रतीत श्लोक सापडतो यावरून एक तर असा निर्णय द्यायला हवा की, ज्या श्लोकावर अभिनवगुप्तांची टीका नाही ते श्लोक प्रक्षिप्त आहेत. हा निर्णय घेता येत नाही. एक तर अभिनव भारती त्रुटित आहे. दुसरे म्हणजे अभिनवगुप्तासमोरची प्रत सर्वांना प्रमाण असणारी प्रत नसून त्यांच्या परंपरेला प्रमाण असणारी प्रत आहे. म्हणन अभिनव गुप्ताने टीका न केलेले श्लोक त्यांच्या समोरच्या प्रतीत नव्हते इतकेच म्हणता येते. ते नाटयशास्त्रात क्षेपक म्हणता येत नाहीत. दुसरा मार्ग हा की, सर्व हस्तलिखितांत हे श्लोक उपलब्ध आहेत. म्हणून ते मूळचा भाग मानायचे. नाट्यशास्त्रात पुनरुक्ती पुष्कळ आहे. कारण तो पौरणिक थाटाचा संग्रहग्रंथच आहे. पण कंगले निष्कारणच एके ठिकाणी प्रक्षेपाची आणि दुसऱ्या ठिकाणी मळ असल्याची भूमिका येथे घेतात. त्यांचा प्रतिशीर्ष हा शब्दही असाच आहे. त या शब्दाचा अथ नहमी मुकुट, पागोट असा करतात, पण नाटयशास्त्रातीलच आहार्य अभिनव भागात प्रतिशीर्ष हा शब्द मखवटे अर्थाने वापरलेला दिसतो.

 हे आणि अशाप्रकारचे मतभेद नाटयशास्त्रावर कुणीही विवेचन करू लागले तरी निर्माण होणारेच आहेत. पण त्यामुळे या परिश्रमाचे महत्त्व कमी होत नाही. नाट्यशास्त्राच्या A आणि B अशा दोन प्रतपरंपरा मानल्या जातात. पण ह्या सर्व प्रतपरंपरांत माहिती तीच असल्यामुळे संस्करणभिन्नता सिद्ध होत नाही, असे कंगले ह्यांचे मत आहे. हे मत बडोदा संस्करणाच्या विरोधी जाणारे आणि मनमोहन घोषांच्याही विरोधी जाणारे आहे. पण मला कंगले यांची भूमिका जास्त उचित वाटते. भरताला आठच रस अभिप्रेत होते, नववा रस अभिप्रेत नव्हता. अभिनवगुप्तांना केवळ नववा शांतरसच अभिप्रेत आहे असे नसून इतर सर्व रस शांतातून निर्माण होतात, शांतता विलीन होतात माणून शांत

८४

ओळख