पान:ओळख (Olakh).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा रस सर्वश्रेष्ठ आहे असेही अभिप्रेत आहे. भरतांनी रससूत्रात स्थायीभावांचा उल्लेख केलेला नाही. ह्याचे कारण असे की, स्थायीभावाचेच परिणत रूप रस असल्यामुळे रससूत्रात स्थायीभावांच्या स्वतंत्र उल्लेखाची गरज नाही, अशी नाट्यशास्त्राची भूमिका आहे. कंगले यांनी नाट्यशास्त्र व अभिनवगुप्त ह्यांच्यातील महत्त्वाच्या फरकावर अचक बोट ठेवले आहे. त्यांचे असेही मत आहे की, नाटयशास्त्रातील स्थायीभाव व रस प्रेक्षकसंबद्ध नसून ते रंगभूमीवरच अभिव्यक्त होतात. अजून एक मुद्दा कंगले यांनी आग्रहाने मांडलेला नाही. तो मुद्दा असा को, लोकधर्मीसुद्धा नाटकाचा भाग असते म्हणून नाट्यशास्त्रात नाटयानुभव हा लोकजीवनाचे अनुकरण करणारा लौकिक अनुभव आहे. थोडक्यात म्हणजे अभिनवगुप्ताची भूमिका नाटयशास्त्राहून वयाच अंशी भिन्न आहे (पृष्ठ ७४ प्रस्तावना) असे कंगले यांना वाटते. हा त्यांचा निष्कर्ष अतिशय महत्त्वाचा आहे. पण तो मला उचित वाटतो. अडचण ही आहे की, हे सगळे सांगितल्यानंतर सबंध भाषांतरभर अभिनवगुप्ताचे स्पष्टीकरण आणि भरताचा अभिप्रेत अर्थ दोन्ही एकत्र कसे आहेत हे सिद्ध करण्याकडे कंगले यांचा कल राहतो.

 सहावा आणि सातवा अध्याय म्हणजे रसव्यवस्था हा संस्कृत साहित्यशास्त्रातील अतिशय जटिल प्रश्न आहे. ह्याबाबतीत जितका काटेकोरपणा आपण दाखव तितका इष्ट आहे. रमचर्चेतील सूक्ष्मतेचा शोध घेण्यासाठी प्रा. कगले सावध असत नाहीत अशी माझी तक्रार आहे. भट्टलोल्लंटाच्या विवेचनात रस मुख्यतः पात्राच्या ठिकाणी असतो. आणि गौण रूपाने नटाच्या ठिकाणी असतो हे प्रतिपादन करणारे अभिनव भारतातील वाक्य कंगले अविश्वसनीय ठरवितात. पण ही भूमिका लोल्लटाची होती यावर मात्र दुमत नाही असेही ते नोंदवतात. म्हणजे लोल्लटाची भूमिका अविश्वसनीय वाक्यावरून निश्चित समजायची काय याला विवेचनाचे शैथिल्य असे म्हणतात. सामान्यपणे शंकूक अनुमतीवादी म्हणून ओळखला जातो पण प्रत्यक्ष अभिनव भारतीत त्याला अनुकरणवादी म्हणून म्हटले आहे. अभिनव भारतीनुसार शंकुकाचा आग्रह अनुमानावर नसून वाचकशक्तीहून भिन्न अशा अभिनयशक्तीवर आहे. शिवाय नाटयानभव सत्यमिथ्या-संशय याहून भिन्न म्हणजे अलौकिक हे आहे. शंकूकाचे हे मद्दे गहीत धरून शंकुकाची भूमिका कोणती ह्याचा एकदा नव्यानेच विचार करावा लागेल. अभिनवगुप्त एके ठिकाणी विभाव हे विघ्न दूर करणारे आहेत असे म्हणतात. दुसन्या एके ठिकाणी त्यांच्या मते विभाव हे अलौकिक आहेत. अभिनवगुप्ताच्या या दोन मतांतच विसंवाद आहे. कारण विभाव जर चर्वणेला उपयोगी असतील तर मग चर्वणेला आरंभ विघ्ने संपल्यानंतर होतो म्हणून विभाव विघ्ननाशक असू शकत नाहीत.

ओळख

८५