पान:ओळख (Olakh).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जर रेखीवपणे त्या साहित्यशास्त्राला काय म्हणायचे आहे हे मढेकरांच्या ध्यानात आले असते तर कदाचित एखाद्या सनातनी शास्त्र्याप्रमाणे मढंकर संस्कृत रसव्यवस्थेचे आग्रही समर्थक झाले असते. मकरांच्या कलामीमांसेतील एका भागाला सर्व रसव्यवस्थेच्या निमित्ताने प्राचीन पूज्य आचार्यांचा पाठिंबा होता. हे साह्य मढेकरांना विनासायास मिळाले असते. कारण संस्कृत साहित्यशास्त्र लौकिक भावनांमधून काव्याचा उदय होतो असे मानत नाही. वाल्मीकमुनींचा शोक श्लोकत्व पावला हे अभिनवगुप्तांना मान्य नाही. निदान अभिनवगुप्तांपासून तरी पुढे मान्य संस्कृत साहित्यशास्त्राचे आग्रहाचे प्रतिपादन आहे की वाङमयाचा उगम अलौकिक भावनांमधन होतो. आणि वाङमयाच्या आस्वादामळे रसिकांना जो अनुभव येतो ती अलौकिक असतो, आनंदही अलौकिक असतो. अलौकिकाच्या सूत्रात असणारी ही संस्कृत काव्यशास्त्राची मांडणी संपूर्णपणे कलावादी तर आहेच पण मढेकरांना हव्या असणान्या जीवशास्त्रीय भावनांपेक्षा सर्वस्वी पथक अशा सौंदर्यभावनेच्या भूमिकेला सुसंगत आहे. अलौकिकाची ही भूमिका एकीकडे जीवनाच्या प्रामाणिक आकलनाच्या जबाबदारीतून कलावंताला मुक्त करीत असते. यानंतर जीवनाचा अमुक भाग का पाहिला नाही हा आक्षेपच घेता येत नाही. आणि दुसरीकडे वाङमयाचा जीवनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारीत असते. अलौकिकाचे सूत्र स्वीकारल्यानंतर उपयुक्ततेच्या सा-या कसोट्याच गैर लाग होत असतात. अभिनवगुप्त, मम्मट आणि विश्वनाथ हे मढेकरांना फार जवळचे आहेत. पण मराठीत ज्या पद्धतीने त्याकाळी रसव्यवस्थेचे स्पष्टीकरण चालू होते, यामुळे ते दरचे वाटले. मढेकरांना रसव्यवस्थेतील एक गोष्ट मात्र कायमची खटकत राहिली असती, ती म्हणजे रसव्यवस्था अलौकितावादी असली तरी सौंदर्याच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाला नेहमीच विरोधी असणार होती पण मढेकरांना स्वतःचा सौंदर्य भावनेचा सिद्धांतही फार मोठा त्यांच्या वस्तुनिष्ठतेच्या आग्रहाला सुसंगत - आहे असे नाही. वाङमय विवेचनात काही विसंगती तक्रार न करता स्वीकारण्याची प्रथा आहे. पण मढेकरांनी काय केले असते या स्वप्नरंजनात फार रमण्यात अर्थ नाही.

 तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आपल्या तिस-या व्याख्यानात संस्कृतमधील रसव्यवस्थेकडे दळलेले आहेत. याठिकाणी त्यांची लेखणी अधिक आत्मविश्वासपूर्ण असावी यात काहीच आश्चर्य नाही. कारण याठिकाणी ते स्वतःच्या हक्काच्या गुहेत वनराजप्रमाणे शतपावली करीत असतात. मढेकरांनी रसव्यवस्थेवर घेतलेल्या आक्षेपांचे स्वरूप मलगामी आहे हे शास्त्रीबुवांनी अचूक ओळखलेले आहे. या मूलगामी आक्षेपांचे

ओळख

६९