पान:ओळख (Olakh).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीवशास्त्रीय ध्येय असणान्या भावना आणि काव्यानुभवातील भावगर्भता यांना संस्कृत साहित्यशास्त्र एकच मानते. आणि या साहित्यशास्त्रात सौंदर्याचे अस्तित्व प्रतिपादन करण्यासाठी सौंदर्यप्रत्यय ही आवश्यक अट आहे. मढेकरांना वाङमयविवेचनात सर्वसामान्य लौकिक भावनांचा आधार घेणारे आणि वाङमयाला रसिकाश्रित ठरवणारे कोणतेच विवेचन पटण्याचा संभव नव्हता. त्या अनुरोधानेच त्यांचे रसव्यवस्थेवर आक्षेप आलेले आहेत. मढे कर जेव्हा म्हणतात की, मराठी साहित्यशास्त्र रसव्यवस्थेच्या आश्रयाने वावरते त्यावेळी त्यांना म्हणायचे आहे ते हे की बहुधा मराठी साहित्यमीमांसक रस हा अंतिम निकष म्हणून मान्य करतात. रसाच्या आधारे ते ललित आणि अललित असा भेद करून टाकतात. आणि रसाच्या आधारानेच ललितकृतींचा दर्जाही ठरवतात. इग्रजांच्या साहचर्यामुळे मराठी साहित्यसमीक्षक इतर अनेक प्रश्नांची चर्चा करू लागले तरीसुद्धा रसव्यवस्थेवरील त्यांचा विश्वास अढळ होता असे मढेकरांना म्हणायचे आहे. मढेकरांच्या म्हणण्याचा प्रतिवाद मराठीमधील बहुतेक साहित्य समीक्षकांनी रसांची कल्पना सदोष म्हणून नाकारली असे दाखवून करता येतो. असा प्रतिवाद करणे जवळ जवळ अशक्यच आहे. कारण काव्य हे रसात्मक असते ही कल्पना विष्णुशास्त्र्यांनी मान्यच केलेली आहे. फार तर आपण असे म्हणू की, विष्णुशास्त्र्यांनी उदात्त हा एक रस मानावा अशी सूचना केलेली आहे. रसांची ही मान्यता कोल्हटकर, केळकर किंबहुना सगळे कलावादी आणि जीवनवादी यांच्यात अप्रतिहत आहे म्हणून कुणालाही जोग, वाटवे, केळकर यांचे विवेचन आपल्या मूलभूत भूमिकेच्या विरोधी आहे असे वाटलेले नाही.
 हिंदू मनाची एक समन्वयवादी ठेवण आहे. गाभ्याचा मूलभूत मुद्दा कायम ठेवून त्या सूत्रात नवनवा तपशील समन्वित करीत राहणे हा हिंदूंच्या मनाचा खेळ आहे. समाजजीवनाच्या संदर्भात वाङमयाचा विचार करणे रसव्यवस्थेच्या विरोधी जाते, असे कुणाला वाटत नाही. आधुनिक मराठी साहित्य समीक्षेत झाले असेल तर ते हे की रसाच्या मूलभूत सूत्रात पाश्चिमात्त्य समीक्षेचे विविध निकष गफण्याचा प्रयत्न मराठी साहित्य समीक्षकांनी केला आणि हे करण्यात कोणताही तार्किक विसंवाद येतो असे त्यांनी मानले नाही. म्हणन वाङमयसमीक्षा पाश्चिमात्त्य वळणावर गेली तरी वाङमयविचाराचा गाभा म्हणून रसव्यवस्थेचे महत्त्व अबाधित राहिले. मढेकरांचा आक्षेप या गाभ्यावर आहे. उरलेला तपशील दाखवून मकरांचा प्रतिवाद करता येईल पण त्याची ग्राह्यता विवाद्य राहणार आहे.

 संस्कृत साहित्यशास्त्राविषयीचे मढेकरांचे ज्ञान अतिशय अपुरे होते.

ओळख

६८