पान:ओळख (Olakh).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणजे शूर्पणखेला विद्रप करणे आणि वालीवध या आहेत. वालीवध तर सरळ सरळ एका कपटघाताचा भाग आहे. कारण वाल्मिकी रामायणाप्रमाणे वानर वैदिक संस्कार झालेले, वैदिक कर्म करणारे वेदज्ञ होते. हे मान्य केल्यानंतर वालीवधाला मगयेचा नियम लावता येत नाही. आणि वानरांना पश म्हणून मान्य केले तर रामचंद्र त्यांना मित्र करू शकत नाही. कारण पश पाळता येतात, त्यांच्याशी तह करता येत नाहीत.
  या पाच कांडांपुरता विचार करू लागलो म्हणजे एक प्रश्न निर्माण होतो. तो हा की, ज्या सीतेसाठी एवढे सगळे युद्ध झाले त्या सीतेचे रामाच्या जीवनात स्थान काय ? या दृष्टीने तीन प्रसंग महत्त्वाचे आहेत. एक तर रामाने वनवासात जाताना सीतेचा निरोप घेतला त्यावेळी त्याने सीतेला राजवाड्यात राहून इतरांची सेवा करण्याचा सल्ला दिला. सीतेने तो ऐकला नाही. ती हट्टाने रामचंद्रावरोवर वनवासात आली हा प्रश्न निराळा. दुसरे म्हणजे रामाचा सुग्निवाशी जो तह आहे, त्यात परस्परांच्या स्त्रियांची परस्परात वाटणी मान्य केली आहे. तिसरे म्हणजे रावणवधोत्तर रामाने सीतेला विभीषण, लक्ष्मण, भरत इ० पैकी कुणाचाही स्वीकार करण्याचा सल्ला दिला आहे. सीतेने हाही सल्ला ऐकला नाही. ही पाच कांडांची कथा, पिताज्ञेसाठी राज्यत्याग करणाऱ्या पराक्रमी पुरुपाची वीरगाथा आहे. पण ती आम्हाला स्वीकारार्ह असणाऱ्या पवित्र मूल्यांची कहाणी नाही. कारण रामचंद्रांनी पित्याला कामलंपट म्हटले आहे.

 माझी खरी अडचण या ठिकाणी आहे. ज्या संस्कृतीने रामकथा निर्माण केली, जिने तिला पहिला आकार दिला त्या संस्कृतीची आणि मूल्यांची कथा म्हणन रामकथेकडे पाहावे हा एक पर्याय आहे. ज्या संस्कृतीने परिवधित करीत, समृद्ध करीत ही कथा पूजनीयतेच्या कळसावर नेली, तिच्यातील मल्यांची कथा म्हणून ती पाहावी हा दुसरा पर्याय आहे. भाऊसाहेब माडखोलकर संबंधित कथावस्तूवरील कथानक तेवढे घेतात आणि वेगळ्या मल्यव्यवस्थेच्या संदर्भात ती कथा पाहतात. हे पाहताना त्यांना नास्तिक जावाली अधिक जवळचा वाटू लागतो. कुलाचार्य वशिष्ट हे त्यांना हटवादी वाट लागतात. वर्णाश्रम धर्मातील सर्व बन्या-वाईटांचे कसोशीने पालन करणारा राम त्यांना इच्छेविरुद्ध न्याय-निर्णय पाळणान्या आजच्या शासनासारखा दिसू लागतो. दया, श्रद्धा व मल्ये जतन करताना आणि जतन करण्यासाठी पुराणकथा निर्माण होतात त्या कथांना त्या संदर्भातून वेगळे करून आपण जर पाहू लागलो तर हे पाहणे आपल्या मूल्यांच्या समर्थनाचे साधन म्हणून पाहणे नाही का ? हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे.

ओळख

६२