पान:ओळख (Olakh).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रमाण असते. या बदललेल्या संस्कृतीच्या गरजा प्रक्षेपाचे कारण असतात. प्रक्षेप हाही पुराणकथेपुरता संस्कृतीचा भाग असतो. क्रमाने मळ केंद्राला नव्या गरजांमळे नव्या कथा येऊन चिकटतात. वंदनीय दिव्य नायकावर क्रमाने काय लादले गेले याचा शोध या प्रक्षेपांच्या अभ्यासातून सापडू शकतो.
 आहे हे सात कांडांचे रामायण गृहीत धरले तरी शंबुकाची कथा जशीच्या तशी स्वीकारता येत नाही. तिचाही विचार करावा लागतो. आमच्या परंपरागत संस्कृतीने वेदविद्येचा व यज्ञांचा अधिकार शूद्रांना दिलेला नाही. शंबक जर वेदाचे अध्ययन-अध्यापन करीत असता तर मग हे त्याचे कृत्य वर्णाश्रम धर्माच्या विरोधी होते. पण शंबक हे काही करीत नव्हता. तो फक्त तप करीत होता. शूद्राला तपही करण्याचा अधिकार नाही असे धर्मशास्त्रांचे मत आहे काय ? ही जागा विवाद्य आहे. कारण पुराणांनी तप करण्याचा अधिकार स्त्रीशूद्रांचा मान्य केलेला आहे. याचे उत्तम उदाहरण स्वत: विदूर आहे. पुराणांमध्ये स्त्रियांच्याही तपाच्या कथा आहेत. या संदर्भात पाहू लागलो म्हणजे शंबुक कथेतील काही जागा सूचक आहेत. शंबुक संदेह स्वर्गाला जाण्यासाठी तप करीत होता. स्वतःला उलटे लटकावून तप करीत होता. आणि तपाची जागा शैवलक पर्वत ही होती. या बाबींमुळे सूचना मिळत असेल तर ही की, शंबक हा तांत्रिक अभिचारी आहे. शंवकाचा वध अभिचारी तांत्रिकाचा वध आहे, हे सांगणे म्हणजे रामचंद्राचे समर्थन करणे नव्हे किंवा प्राचीन संस्कृतीतील अन्याय, विषम व्यवहाराला शघ्र प्रकाशात दाखविणे नव्हे.

 रामायणाच्या सात कांडांपैकी पहिले आणि सातवे कांड प्रक्षिप्त मानले तर रामचंद्राच्या जीवनातील अनेक घटना आपल्याला सोडूनच द्याव्या लागतील. दशरथाचा पुत्रकामेष्टी यज्ञ, श्रावण वधाचा शापही मळ जातक कथा आहे. ती येथे आलेली आहे. राम हा विष्णूचा अवतार ही कल्पना, रामाने केलेला त्राटिका वध, शिवधनुष्यभग हे तर सोडून द्यावेच लागेल. पण पुढे उत्तर कांडात येणान्या सीतात्याग, लक्ष्मण त्याग, शंबुक वध याही घटना सोडन द्याव्या लागतील. त्यानंतर जी रामकथा शिल्लक राहते, तीही उज्ज्वल आहे. कारण त्यात पित्याच्या शब्दासाठी राज्यत्याग आहे. किरात, खर, दूषण, रावण, मारिच यांचे बंध आहेत. त्याग आणि पराक्रम आहेच पण त्याखेरीज अद्भुताचे अनेक अंश आहेत. शबरीचा उद्धार आहे, समुद्रावर दगडांचे तरणे आहे, जटायूचे बलिदान आहे. म्हणजे याही कथांत त्याग, पराक्रम, दिव्यता, अद्भुतता या बाबी आहेतच. फक्त राम ईश्वरावतार नाही. या भागातील रामाच्या चारित्र्यात कलंक लावणाऱ्या महत्त्वाच्या दोन घटना

ओळख

६१