पान:ओळख (Olakh).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 हे मुद्दे मी माडखोलकरांच्या — जन्मदुर्दैवी' कादंबरीच्या संदर्भात जरी उपस्थित करीत असलो तरी ते या कादंबरीपुरते नाहीत. या मुद्दयांचे स्वरूप त्यापेक्षा अधिक व्यापक व निराळे आहे. ऐतिहासिक कादंबरीच्या बाबत जसे अनेक प्रश्न आहेत; तसेच पौराणिक कादंबऱ्यांच्या बाबतीतही आहेत. एतिहासिक कादंबरी ही एका कर्तत्वान नायकाच्या कर्तत्वाची कहाणी बहुधा असते. परंपरेने, जनतेने ही माणसे एका विशिष्ट दृष्टीने स्वीकारलेली असतात. शिवाजी हा हिंदूचा नेता, मुसलमान विरोधक, रामदासांचा शिष्य, शंकराचा अवतार, भवाना त्याला प्रसन्न होती, तो मोठा पुण्यवान, तो स्वर्गाला गेला हे परंपरेला. मान्य असणारे सत्य स्वीकारून ऐतिहासिक कादंबरी लिहावी हा एक प्रश्न आहे. एतिहासिक कादंबरीत कल्पितांचे स्थान काय? कल्पिताच्या वापराचा हेतू काय ! हा दुसरा प्रश्न आहे. असेच प्रश्न पौराणिक कादंबरीच्या बाबतीही आहेत. पौराणिक कादंबरी ही पूराणांमध्ये दडन असलेल्या आणि चर्च ने शोधून काढलेल्या इतिहासाची कहाणी नव्हे. यावाबत मी निःशंक आहे. पुराणातील इतिहास मीही शोधण्याचा प्रयत्न केला आहे पण हे इतिहास संशोधन पौराणिक कादंबरीचा आधार होऊ शकणार नाही. पौराणिक कहाणी जर पुराण संस्कृतीच्या मूळ मूल्यांची कहाणी म्हटली तर मग अद्भुतांचा व दिव्यत्वाचा अंश असणारी पण पुराणमूल्यांचे आकलन करणारी ती एक वेगळ्या प्रकारची ऐतिहासिक कथाच होते. जर निकटवर्तीय परंपरागत संस्कृतीची मान्य कहाणी म्हणून पुराण कहाणी पाहिली तर, तिच्यातील मूल्यांशी बदलत्या समाजाला सहमत होता येणेच कठीण आहे. म्हणून काही प्रसंग गाळणे, काहींचे नवे स्पष्टीकरण करणे हे उद्योग करावे लागतात. यामुळे पुराणकथा किर्लोस्करांच्या सौभद्राप्रमाणे कौटुं विक रंजनाची कथा होते. किंवा खाडिलकरांच्या कीचकवधाप्रमाणे प्रचाराचे साधन होते. आणि ज्या वेळेला आपण मानव जीवनातील शाश्वताविषयी चिंतन करू लागतो व त्या चितनाचे नायक पुराणात शोध लागतो-जसे माडखोलकरांनी केले आहे- तेव्हा त्यातून प्राचीन पुराणकथेचे कलेच्या पातळीवर आविष्करण होत नसते. नव्या पुराणकथेचे सजन होत असते.

 पौराणिक कथेतील व्यक्ती या व्यक्ती उरलेल्याच नसतात त्या प्रतीक झालेल्या असतात. त्यांच्यातील मानवीपणाचे अंश शक्य तो पुसट झालेले असतात. अतिमानवी अंश उठावदार झालेले असतात. कथांना कलेच्या पातळीवर न्यायचे असेल तर त्या नुसत्या प्रतीकात्मक राहून चालणार नाहीत, त्यांच्यात मानवी व्यक्तिमत्त्वाचे काही शाश्वत पण धर्म असणारी पण मानवी व्यक्तित्त्वे शोधावी लागतील. हा शोध करताना मळ संस्कृती गृहीत धरावी की उत्तर संस्कृती गृहीत धरावी की आजच्या मूल्यांच्या संदर्भात नवी पुराणकथा सजन करावी
?

ओळख

६३