पान:ओळख (Olakh).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मो स्वतःच चिकित्सावादी आहे. त्यामुळे चिकित्सा व संशोधनाला माझी हरकत नाही पण पौराणिक चिकित्सेत सस्कृतीची मूल्ये सहभागी असतात. पुराणकथा हा नुसता इतिहास नसतो. हजारो वर्षे या कथा संस्कृतीने पूज्य मानलेल्या असतात. पुराण कथांचे पावित्र्य, त्यांच्या इतिहास प्रमाणतेत नसून संस्कृतीच्या मान्यतेत असते. रामचंद्राचे जीवन दिव्य आणि पवित्र्य मानायचे असेल तर त्या पावित्र्याची चौकट भारतीय संस्कृतीतील मूल्यांनी बनलेली असते. मग रामचंद्राने केलेला शंबुकाचा वध न्याय्य मानणेच भाग असते. हा वध रामचंद्राला अनिच्छेने, कर्तव्य म्हणून करता येणार नाही. उत्साहाने पवित्र धर्म कर्तव्य म्हणून करावा लागेल. शूद्रांच्या सहवासात रमलेल्या भवभतीला रामचंद्राच्या मनात शंवक वधाची खंत दाखविता येते. पवित्र वाल्मिकीच्या मते रामाने शंबकाचा वध केल्यानंतर देवांनी आनंद व्यक्त करून आशीर्वाद दिले. रामचंद्राचे वर्तन, त्याची पूज्यता समर्थनीयता भारतीय संस्कृतीच्या चौकटीत आपण पाहणार की नाही हा खरा प्रश्न आहे. सीता त्याग, शंबकवध या ठिकाणी रामचद्राचे वर्तन विवाद्य मानायचे असेल तर मग मूलगामी ऐतिहासिक चिकित्सेची तयारी ठेवावी लागेल. त्या चिकित्सेनंतर शोक आणि दिव्यत्व दोन्हीही शिल्लक राहणार नाहीत.

 रामायणाच्या चिकित्सेचा आरंभ मळातच काडांच्या संख्येपासून होतो. अगदी आरंभापासून संशोधकांनी एक गोष्ट नोंदविलेली आहे, ती म्हणजे रामायणाच्या सात कांडांपैकी पहिले आणि सातवे कांड हा मळ कथेचा मळ भाग नसून प्रक्षेप आहे ही दोन्ही कांडे प्रक्षिप्त मानली तरी त्या कथा फार जुन्या आहेत. भवभूतीच्या पूर्वीपासून उत्तरकांडाला प्रतिष्ठा आहे. कदाचित कालिदासाच्याही पूर्वीपासून उत्तरकांड प्रतिष्ठित आहे. पण हा मूळ कथेतील क्षेपक भाग आहे. बालकांड आणि उत्तरकांड प्रक्षिप्त गृहीत धरून जे शिल्लक राहील ती मूळ कथा आहे. प्रक्षेपांचा शोध घेऊन त्यांचा निरास करण्याचा हेत अशक्य वाटणारे चमत्कार गाळन टाकणे, वास्तववादी शक्य कथा शोधणे व तिला इतिहास म्हणून मान्यता देणे, हा नसतो; हे येथे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. पुष्कळदा मूळ कथानकच अद्भुत असते. आणि प्रक्षेप त्या अद्भुत थोडेतरी संभाव्य रूप देण्याचा प्रयत्न करतो. ज्या नायकाचे दिव्यत्व समाज मान्य करतो त्याचे दैवीकरण होऊन एका पूराणकथेला आरभ होतो. त्या पुराणकथेच्या उदयाच्या वेळीच तिच्यात अदभतांचे अनेक अंश असतात. या मूळ केंद्राला क्रमाने नव्या कथा येऊन चिकटतात, ज्या संस्कृतीने पुराणकथा निर्माण केली, तिची कथा म्हणन पुराणकथा पाहणे हा प्रक्षेप निवारणाचा हेतू असता. बदलत्या काळात मूल्य बदलतात; पूराण नायकांचे वंदनीयत्व शिल्लक असत,

ओळख

६०