पान:ओळख (Olakh).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निरवानिरव करीत होते. पुत्रांना गादीवर बसवून ते निवृत्त होणार होते. कालपुरुषाच्या निरोपानंतर दुसरा प्रश्नच उरलेला नव्हता. शक्य तितक्या लवकर देहविसर्जन करणे एवढे एकच कार्य आता उरलेले होते; दुर्वासाच्या आकस्मिक आगमनामुळे निर्माण झालेला घोटाळा जरी समोर नसता तरी पुढे काय होणार होते ? राम, भरत, शत्रुघ्नांनी शरयूत देह विसर्जन करणे. त्यावेळी त्या मरणसोहळयात तिघांच्याऐवजी चौघे सामील झाले असते. ज्यांच्यासमोर मरण्याखेरीज दुसरे काही कर्तव्य म्हणूनच उरलेले नाही, त्या मंडळीच्या जीवनात कारणे कोणतीही असोत. एकाचे चार दिवस आधी मरणे, इतरांचे चार दिवस नंतर मरणे, एकमेकांचा वियोग होणे इतका फरक दुर्दैवाला पुरत नाही. जगण्यासारखे पुढे काही तरी शिल्लक असावे लागते. अशा वेळी जे हक्काचे असते, त्याची इच्छेविरुद्ध झालेली ताटातूट हा दुर्दैवाचा गाभा असतो. दुर्दैवात स्वेच्छेने केलेले आत्मदहन बसू शकत नाही. कर्तव्य-परतंत्रांचा व्यथाभोग केवढाही दिव्य असो, ते दुर्दैव म्हणता येणे कठीण आहे. मरणाच्या उंबरठ्यावर द्रौपदी सर्वाआधी जमिनीवर पडली हे धर्माचे दुर्दैव नव्हे रामासमोर जगण्यासाठी शिल्लकच काही नाही म्हणून लक्ष्मणाचा त्याग हे रामाचे दुर्दैव म्हणावे कसे ?

 वाल्मिकी रामायणातल्या-वारीकसारीक वाबी माडखोलकर नोंदवतात. दशरथाकडून मारला गेलेला श्रावण ब्राह्मणकुमार नव्हे. त्याचे वडील वैश्य आणि आई शूद्र होती, त्राटिका मूळची राक्षसी नव्हे मुळात ती रूपसुंदर यक्षस्त्री होती. अशा वारीक सारीक बाबी नोंदविणारे माडखोलकर एक निर्णायक प्रसंग मात्र विसरलेले आहेत. तो का व कसे विसरले हे कळणेच कठीण आहे ? कोणे एके काळी आपल्या लाडक्या पत्नीला दशरथाने दोन वर दिलेले होते. त्याचा गैरफायदा कैकयीने घेतला ही प्रसिद्ध बाब आहे. अप्रसिद्ध पण वाल्मिकीने नोंदविलेली आणखी एक बाब आहे. ती अशो की कैकयीशी विवाह करताना दशरथाने कैकयीच्या पित्याला कैकयीचा पुत्र राज्याचा उत्तराधिकारी होईल असे वचन दिलेले होते. या भूमिकेला अनुसरून सारा व्यवहार चाल होता. कैकयीच्या माहेरची मंडळी अयोध्येत सर्वत्र पदाधिकारावर होतो. बहधा कैकयीच्या फौजाही अयोध्येत असाव्यात. दशरथाने भरताला आजोळी पाठवून कैकयीला अंधारात ठेवून रामाला गादीवर बसविण्याचा उद्योग केला. होच फसवणूक होती. ह्या फसवणुकीत स्वतः रामचंद्र सहभागी होते की नाही ? हा रामचरित्रातला निर्णायक प्रसंग आहे. या कारस्थानात जर राम सहभागी असेल तर त्याच्या राज्यत्यागाचा अर्थ गादी मिळविण्याचा प्रयत्न विफल ठरला इतकाच होतो. रामप्रभूच्या जीवनाचे मूल्यमापन करताना निर्णायक ठरणारी अशी ही वाव आहे. ती भाऊसाहेब कशी विसरले कोण जाणे !

ओळख

५९