पान:ओळख (Olakh).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'जन्मदुर्दैवी ' च्या निमित्ताने



 आमचे ज्येष्ठ व आदरणीय सुहृद भाऊसाहेब माडखोलकर यांनी आता वयाची सत्तरी ओलांडली आहे. काहीही म्हटले तरी आता भाऊसाहेब वयोवृद्ध झालेले आहेत. पण त्यांच्या लेखनाचा उत्साह अजूनही अम्लान आहे. भाऊसाहेबांच्या कादंब-या चिकित्सकांसाठी नेहमीच विवाद्य ठरल्या आहेत. अलीकडे ते पौराणिक कादंबरीकडे वळलेले आहेत. त्यांच्या तारुण्यातील सामाजिक आणि राजकीय कादंबरी ही जशी निराळी होती तशी त्यांची पौराणिक कादंबरी निराळी आहे. त्यांची पौराणिक कादंबरी हे एक कादंबरीच्या रूपाने पुराणकथेवर केलेले चितनगर्भ भाष्यच असते. या कादंबन्यांची कलात्मकता हा विवेचनाचा एक विषय असू शकतो. माडखोलकरांच्या भाष्याची समर्थनीयता हा विवेचनाचा दुसरा विषय असतो. ह्या ठिकाणी माझा हेतू माडखोलकरांच्या 'जन्मदुर्देवी' या कादंबरीत जे चिंतन आहे, त्या संदर्भात थोडेसे विवेचन करण्याचा आहे.

 'जन्मदुर्देवी या कादंबरीचा विषय प्रभू रामचंद्राचे जीवन आहे. रामचंद्राच्या उज्ज्वल चरित्र-चारित्र्याचे मनन, चिंतन करणे हा भारतीय मनाचा एक ध्यास आहे. प्रत्यक्ष भगवान शंकरानी सारे सर्वांना वाटून टाकल्यावर स्वतःजवळ मनन, चितनसाठी फक्त । राम' ही दोन अक्षरे जतन करून ठेवली असे भाविकांची परंपरा मानते. मग माडखोलकरांसारख्या शैवाला रामकथेचे आकर्षण वाटावे यात नवल काहीच नाही. कादंबरीसाठा विषय म्हणून लक्ष्मणाच्या जीवनातला शेवटचा दिवस निवडला आहे. त्यामुळे या कथेत घटना फारशा नाहीत. पात्रेही राम व लक्ष्मण ही दोनच आहेत. आणि कालावधीही फक्त काही तासांचा आहे. माडखोलकरांना हे ठिकाणच महत्त्वाचे वाटते. ज्या ठिकाणी शोकाच्या गाढ छायेखाली उभे राहून कर्तृत्व स्वतःचे मूल्यमापन

ओळख

५७