पान:ओळख (Olakh).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



करीत आहे हे ठिकाण रामचरित्रावरील भाष्यासाठी महत्त्वाचे आहेच. भाऊसाहेबांच्या मते रामचंद्र जन्मदुर्दैवी आहे. त्याचा जन्मच शापातून व शोकातून झालेला असल्यामुळे त्याच्या जीवनात व त्याच्यावर निष्ठा ठेवणान्यांच्या जीवनात दुःख भोग अटळच आहे. सीतेवर ; मिलेवर आणि लक्ष्मणावर झालेला अन्याय चटकन जाणवतो. पण रामचंद्राला नेहमी स्वतःवरच अन्याय करावा लागला. आणि तो त्यानेच केलेला असल्यामुळे चटकन जाणवणारा नाही. सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात ज्यांनी जवळून निरीक्षण केले आहे, त्यांना ध्येयवाद्यांच्या जीवनातले आत्मदहनाचे उत्कट क्षण भारल्याशिवाय राहात नाहीत. माडखोलकरांचे हे संज्ञान त्यांच्या मनाच्या प्रगल्भतेचे द्योतक आहे.
 माडखोलकरांनी रामायण बारकाईने चाळलेले आहे. त्यामुळे सामान्यपणे अप्रसिद्ध असणा-या पण वाल्मिकीने नोंदवलेल्या अनेक घटनांकडे त्यांनी मार्मिकपणे लक्ष वेधलेले आहे. भवभती त्यांना बालमित्रासारखा असल्यामुळे रामाचा शोक त्यांना नित्य परिचित होताच. जन्मभर वेदनेच्या वर्तुळात कर्तव्य म्हणन वावरणारा हा पराक्रमी वीर ज्या पद्धतीने माडखोलकर पाहतात ती पद्धत धर्माला व परंपरेला मान्य नाही. ज्याच्या पदस्पर्शाने शीला उद्धरल्या, समद्रावर दगड तरले, ज्याने बंदिखान्यातून ३३ कोटी देव सोडवले, जो देवांचा ही उद्धारकर्ता मर्यादा पुरुषोत्तम प्रमू तो पावन असू शकतो, तो दुर्दैवी आहे हे पंरपरावादी मनाला पटणारच नाही. पण त्या सश्रद्ध वाचकांसाठी श्रीधर आहे, त्याचा रामविजय आहे, माडखोलकरांची कथा त्यांच्यासाठी नाही. ज्या बोधवाद्यांनी स्त्रियांचे व शूद्रांचे अधिकार समथित करण्यासाठी रामकथेचा बोधसाधन म्हणन विचार केला. त्यांच्याहीसाठी माडखोलकरांची कथा नाही. माडखोलकरांना रामकथेचा चिकित्सक विचारही करावयाचा आहे. त्यानिमित्ताने ध्येयवाद्यांच्या जीवनातील अटळ दुःखावर भाष्यही करावयाचे आहे. त्यांची रामकथा कर्तव्यपरतंत्र थोर पुरुषाची शोककथा आहे, पण ती दिव्य शोक कथा आहे.

 माझी खरी अडचण या ठिकाणाहून सुरू होते. बोधवाद्यांसमोर असणारे कालिक प्रश्न आणि परंपरावाद्यांसमोर असणारी श्रद्धा बाजला ठेवली तरीही मला माडखोलकरांच्या भूमिकेशी सहमत होणे कठीण आहे. रामायणाचा चिकित्सक अभ्यास व विचार कसा करावा हे मला स्वतःला समजत नाही आणि भाऊसाहेबांची अभ्यासाची पद्धत मला स्वतःला पटत नाही. आज हे संपूर्ण सात कांडांचे रामायण आपल्यासमोर आहे, ते जरी गृहीत धरले तरी लक्ष्मणाचा त्याग ही घटना दुर्दैवी ठरत नाही. रामचंद्र आपल्या जीवनाची

५८

ओळख