पान:ओळख (Olakh).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



लेली शक्ती घटोत्कचावर वापरतो. तेजोभंग करणारा सारथी पत्करतो व शेवटी लढताना मरण्याऐवजी रथाचे चाक उचलताना मरणे श्रेयस्कर मानतो.
 विजय देशमुख मला म्हणतील : महाशय, इतरांच्यासाठी प्रतींच्या आधाराचा मुद्दा आपण उपस्थित करता. आपण हे सगळे कोणत्यातरी प्रतीच्या आधारे सिद्ध करून दाखवा. माझे छोटेसे उत्तर हे आहे की हे व्यासाचे मनोगत नव्हे. त्या कथेचे चिंतन करताना अभिव्यक्त झालेले माझे मनोगत आहे.