पान:ओळख (Olakh).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



शिरण्याचे कारण नाही. आपल्याला अमूक प्रत ग्राह्य वाटते असे मानून ते पढे जाऊ शकले असते. चिकित्सक आवृत्तीच्या संदर्भात असे विषयांतर करण्याची माझ्यासारख्याला गरजही पडली नसती.
 अचिकित्सक आवृत्तीतील कथेवर आधुनिक मूल्ये लावणे, अचिकित्सक आवृत्ती परंपरेच्या मूल्यांनी तपासणे असाच दुहेरी अभ्यास चिकित्सक आवत्तीच्या संदर्भात करणे आणि चिकित्सक आवृत्तीच्याही मागे जाऊन इतिहासाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे हे अभ्यासाचे एकण प्रकार मला दिसतात.आणि या सर्वच प्रकारांचे स्वागत करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे असे मला वाटते. जर कर्णाने आत्मसमर्पण केले असेल आणि हे जर कुणाला जाणवत असेल तर तो विचार करण्याजोगा मुद्दा आहे. याचा विचार सर्व बाजूंनी झाला पाहिजे. कारण भारतीय युद्धात आत्समर्पण एकटयाचे नाही. परंपरा असे मानते की भीष्मांनीच स्वतःचा वध करण्याचा उपाय सांगितला आणि आत्मसमर्पण केले. कारण युधिष्ठिराचा जय होणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. परंपरा असेही मानते की द्रोणाचार्यांनीसुद्धा आत्मसमर्पणच केले. या दोन आत्मसपर्पणांच्या बरोबर कर्णाचे अजून एक आत्मसमर्पण धर्मरक्षणार्थ ग्राह्य मानले जाऊ शकत असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचे कुणालाच कारण नाही. पण त्या निमित्ताने कर्ण राधेय की सूर्यपुत्र हा मुद्दा वादविषय होऊ नये. कर्ण हा खरोखरी सूर्यपुत्र आहे. तो कौंतेय आहे आणि धर्मशास्त्रानुसार पहिला पांडव आहे हा मुद्दा सर्वमान्य आहे. स्वतः कर्णालाच धर्मशास्त्रानुसार आपण पांडव आहोत हे मान्य आहे. कर्णाचे सूर्यपुत्रत्व उत्तरकालीन कुणीच नाकारलेले नाही. समकालीनांना ते माहीत नव्हते. ते जर समकालीनांना माहीत असते तर समकालीनांनीही त्याला सूर्यपुत्र म्हटले असते. पण मग कदाचित महाभारत कथा घडलीच नसती. कदाचित कर्णाने बंधंच्यासहित दर्योधनाची सेवा केली असती. उरलेल्या पांडवांनी हा निर्णय मानला असता. कदाचित पंडचा ज्येष्ठ पुत्र म्हणून कर्णाने गादीवर हक्क सांगितला असता आणि मग दुर्योधन व कर्ण यांचेच युद्ध झाले असते. काय झाले असते कुणी सांगावे ? पण भारतीय संस्कृतीने गेली दोन हजार वर्षे कर्ण सूर्यपुत्रच मानला आहे. तो सूतपुत्र कुणी मानला नाही. कर्णाला राधेय म्हणणे किंवा कर्णाने स्वतःला राधेय समजणे हे अज्ञान आहे हा वेदान्तातला प्रसिद्ध मद्दा आहे. निदान योगवासिष्ठापासून आजतागायत तो सर्वमान्य आहे. म्हणजे हजार वर्षे तो सर्वमान्य आहे. आचार्य विनोबा भावे कर्ण सूर्यपुत्रच होता तो कौंतेय कधीच नव्हता असे सांगतात त्याचे कारण हेच आहे.
सर्वांच्या समोर उघड असलेला पण प्रायः सर्वांनी मांडण्याची टाळा

४०

ओळख