डॉ. सुखठणकरांनी घालून दिलेली ही सर्वसामान्य पद्धती असल्यामुळे तिचा वेगळा उल्लेख करण्याचे संपादकांना कारण वाटले नाही.
देशमखांनी जावा-भारताचा उल्लेख केलेला आहे. कर्णपर्वाबाबत तुलना करण्यासाठी जावा भारत आज उपलब्ध नाही. पण समजा जरी जावाभारत उपलब्ध असते तरी काय झाले असते ? कारण जावाभारत चिकित्सक आवृत्ती सिद्ध करण्याच्या प्रक्रियेचा आधार नाही. जावाभारताचा वापर चिकित्सक आवृत्तीशी तुलना करून ती आवत्ती जावाभारताच्या मानाने कशी दिसते हे पाहिले जाते. जावाभारत आणि चिकित्सक आवृत्ती यांच्या तौलनिक अभ्यासाचा निष्कर्ष हा आहे की स्थूल मानाने चिकित्सक आवृत्ती आणि जावाभारत एकमेकांशी मिळतेजुळते असते. जावाभारतात असलेला आणि चिकित्सक आवृत्तीने प्रक्षिप्त मानलेला भाग प्रायः उत्तरी प्रतीत असतो. जावाभारत हा महाभारताच्या उत्तरीय प्रतीचा अवतार आहे. आजच्या चिकित्सक आवृत्तीने जो भाग प्रक्षिप्त मानला आहे तो भाग जावाभारत असते तरीही प्रक्षिप्तच मानला गेला असता. आणि हा प्रक्षिप्त भाग जर जावाभारतात असता तर तो उत्तरी प्रतीत कसा आहे एवढे दाखवून दिले असते. म्हणून आजच्या चिकित्सक प्रतीत जावा भारतातील कर्णपर्व उपलब्ध झाले तरी बदल होण्याचा संभव नाही. सवव हा मुद्दा अप्रस्तुत आहे. उपलब्ध हस्तलिखितांपैकी सर्वांत जुने हस्तलिखित हा क्षेपक भाग प्रमाण मानत काय ? हा मुद्दाही चर्चेत गैरलागू आहे. कारण काळाच्या दृष्टीने जुने असणारे कोणतेही हस्तलिखित इ. स.१०० च्या पूर्वीचे नाही. जुने हस्तलिखित जुनेही जरी असले तरी जर कोणत्याही प्रतपरंपरेत हा भाग सार्वत्रिक नसला तर तो प्रक्षिप्त मानला जातो.
माझी तक्रार देशमुखांनी चिकित्सक आवृत्तीवर आक्षेप घेतला याबद्दल नाही. चिकित्सक आवत्तीवर सर्व बाजूंनी आक्षेप घेण्यात आले पाहिजेत. ती अग्निपरीक्षेत तावून सुलाखून बाहेर पडली पाहिजे. नाहीतर रद्द मानली पाहिजे असे मी समजतो. गेली सुमारे चाळीस वर्षे विविध प्रकारची आक्षेपपरंपरा चचिली गेलीच आहे. अशी चर्चा यापुढे ही चालू राहावी. प्रश्न इतकाच आहे की चिकित्सक आवृत्तीचा हेतू आणि सूत्रे लक्षात घेऊन टीका व्हावी. एखादे सूत्र चुकले असेल तर त्याचा ऊहापोह व्हावा. सूत्राचा वापर चुकला असेल तर तो दाखवावा. नवे अधिक उचित सूत्र चर्चेला दिसत असेल तर ते चर्चेला प्रसत करावे. सुखठणकरांवर जगाच्या ज्ञानाचा शेवट झाला आहे असे निदान मी तरी समजत नाही. भविष्यात देशमुखांच्या आधारे पण असे काही न करता वैद्यांसारख्या संपादकावर स्वतःच्या समजुतीनुसार प्रत रचल्याचा आरोप होऊ नये अशी असते. आणि देशमुखांना या ग्रंथापुरते तरी या वादात
३९