Jump to content

पान:ओळख (Olakh).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




नाद्यांचा अधिक्षेप होत आला आहे. जडवादी आत्मा व पूनर्जन्म मानत नाहीत हे खरे आहे. ते स्वर्ग नरक आणि मोक्षही मानीत नाहीत हेही खरे आहे स्वर्ग नाही म्हणून पाप पुण्य नाही असेही वादाच्या भरात जडवाद्यांनी म्हटले, असेल पण म्हणून जडवाद चांगले आणि वाईट, न्याय आणि अन्याय, नीती आणि अनीती ह्या कल्पना मानीत नाहीत की काय ? अध्यात्मवाद्यांचा असा आरोप आहे की जडवादी फक्त शरीरच खरे मानतात म्हणन त्या दर्शनात भोगच तेवढा खरा असतो बाकी सगळे खोटे असते. हजार वर्षे लाखवेळा जरी हा आक्षेप घेण्यात आला तरी तो खरा नव्हे. काही अध्यात्मवादी मोक्ष सुख हे रतिक्रीडेसारखे मानतात. रतिसुख अल्पकाळच टिकते म्हणून प्रयोग व अभ्यासाने जर रती काळ आपण लांबवू शकलो तर ही भोग साधना आपणास मोक्षापर्यंत नेईल ही भूमिका घेणारे अध्यात्मवादी धर्माचे नाव घेऊन कामसाधना करीत आले. त्यांचे मठ व्यभिचाराचे प्रसिद्ध अड्डे होते. काही अध्यात्मवाद्यांनी देवाच्या मनोरंजनार्थ देवदासी हव्यातच अशी भूमिका घेतली : देवळांचे कुंटणखाणे बनविले, अध्यात्मवाद्यांचा हा चैन, भोग, विलास आणि ही कामपिसाटवत्ती आपण नोंदविली तरी त्यामळे अध्यात्मवाद हाच भोगवाद ठरत नाही. काही जडवादी भोगवादो होते हा मुद्दा अशा वेळी गैरलाग होतो. अध्यात्मवाद जसा भोगवाद नसतो तसा जडवादही भोगवाद नसतो.


 खरा प्रश्न याहन निराळा आहे. स्वर्गाची लालच आणि नरकांची भीती जर संपली, सर्वन, सर्वसाक्षी, सर्वव्यापी परमेश्वराच्या आदेशाचा टेक जर संपला तर, नीतीचा आधार कोणता ? जडवाद्यांचे असे म्हणणे आहे की, परमेश्वरीय आदेश नेहमीच अन्याय्य समाजरचना टिकवन धरण्यासाठी वापरले गले असा इतिहाम आहे. आपण नीतीचा आधार सर्वांचे सुख व कल्याण असा मान व चांगले वाईट काय हे आपल्या बुद्धीने ठरवू. सर्वांच्या कल्याणाशी प्रत्येकाचे दायित्व हा प्रश्न एकदा समाजजीवनात उपस्थित झाला म्हणजे संयमाचा प्रश्न उपस्थित होतो. काही जडवादी भोगवादी असतील पण जगाचे वैचित्र्य यात आहे की जडवादातील भोगवादी नेहमीच अध्यात्मवाद्यांचे सहप्रवासी राहिले. खांडेकर जडवादी खरे पण ते भोगविरोधक आणि संयमाचे पुरस्कर्ते आहेत. हो नुसता जड़वाद नव्हे समाजवाद्यांचा जडवाद आहे. सगळेच समाजवादी संयमाचे पुरस्कर्ते असतात म्हणून त्यांच्या प्रतीककथेला संयमाचा प्रतिनिधी लागतो. समाजवादी असे मानतात की ते एका नव्या संस्कृतीचे पाईक आहेत. नीतीचे प्रतिष्ठापनाकर्ते आहेत म्हणून संयमाचा प्रतिनिधी कच आहे. साने गुरुजींचा आस्तिक व खांडेकरांचा कच ह्यांची तुलना एकदा करून पाहण्याजोगी आहे. कारण कचाचे मूळ तिथे आहे. खांडेकर जडवादी असल्या

ओळख

१६