पान:ओळख (Olakh).pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या माध्यमातील भारतभरच्या एकूण आविष्कारांची नोंद घेणे व त्यांचे यथासांग विवेचन करणे हेही एक मोठे काम आहे. अशाप्रकारे आपण पाह गेलो तर मग लोकसाहित्याच्या भारतातील सोडा, महाराष्ट्रातील सुद्धा सर्व प्रकारची नोंदी या ग्रंथात सापडणे कठीण आहे. लोकसाहित्यातील सर्वच अंत:प्रवाह इथे नोंदविलेले आहेत असे नाही, आणि असे करणे कुण्याही अभ्यासकाला शक्य नसते. मांडे यांनी दिशा दाखवलेली आहे. ही दिशा दाखवताना शब्दाखेरीज असणारे लोकसाहित्य विचारात घेऊन त्यांनी या साहित्याच्या विधीशी संबंध जोडला आहे. या विधींचा पुरातन श्रद्धांशी असणारा संबंध शोधीत शोधीत ते यातुश्रद्धेने प्रभावित झालेल्या मनापर्यंत गेले आहेत आणि त्या आदिम मानवाच्या श्रद्धेचे आजही रूढ असणान्या आचारविधीत असणारे असणारे अवशेष त्यांनी दाखविलेले आहेत. दिशादर्शन या दृष्टीने विचार केला तर ही एक समग्र सुसंगत मीमांसा आहे. एका अभ्यासकाला इतकेच करता येत असते. पण मगळाच पुरावा गोळा करून सगळ्याच प्रश्नांना एकत्र करणारा कोश एका अभ्यासकाला सिद्ध करता येत नसतो.
  समाजजीवनाची प्रक्रिया गंतागंतीची असते. परंपरेने लोकांच्या मनामध्ये स्थिरावलेल्या कथा सुधारून घेऊन शिष्ट-संस्कृती त्या आत्मसात करते ही एक प्रक्रिया आहे. ह्या सुधारित कथा आणि लोकसमाजातील रूढ कथा यांचा समन्वय करणाऱ्या कहाण्या निर्माण होतात. ही दुसरी प्रक्रिया आहे आणि शिष्टांच्या कहाण्या झिरपून लोकसमूहात उतरतात व रूपांतरित होऊन तिथे स्थिरावतात ही तिसरी प्रक्रिया आहे. लोक-देवतांच्या बाबतीत ह्या सर्वच प्रक्रिया एका वेळी चाल असतात. त्यांचा नीट उलगडा करणे कठीण आहे. ते कष्टाचे काम आहे याबाबत कोणतेही विवेचन नेहमी सर्वमान्य होईलच अशी अपेक्षा बाळगता येत नाही. त्यादष्टीने दोन ठिकाणे पाहण्याजोगी आहेत. एक देवतांच्या बाबतीत हनुमंत आहे. दुसरे कथांच्या बाबतीत रामायण आहे

 मळामध्ये आदिमानव समाजाची एक ग्रामरक्षक देवता आहे. ती आजार बरे करते, लग्ने घडवन आणते, पुत्र देते, गावाचे संगोपन करते, भूत-प्रेतांना गावात शिरू देत नाही असे हे एक रूप आहे. आदिमानव समाजात एकेका टोळीची देवके आहेत हे लक्षात घेता ही जी टोळीचे रक्षण करणारी मंळंची ग्राम-देवता. ती 'एनमंते ' असण्याचा (आणि या उच्चाराचे हनमंत' हे रूप असण्याचा) संभव जास्त आहे. एक देवता यक्ष आहे ती निरनिराळ्या मंत्रविधीची जारण-मारण उच्चारणाची, चेटूक व जादूची देवता आहे. वीर हे यक्षाचे नाव आहे. कदाचित बजरंग (वज्रांग) हे. या यक्षाचे नाव असावे. आणि रामायणातील. रामचंद्राचा भक्त, आणि साह्यकर्ता असा एक मारुती आहे.

१३५

ओळख