पान:ओळख (Olakh).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विवधतेचा आणि वैचित्र्याचा पसाराही पाहणे महत्त्वाचे आहे. काही कल्पना जगभर सापडतील तर काही कल्पना फक्त भारतातच सापडतील आणि काही कल्पना भारताच्या एखाद्या विभागातच सापडतील. मानवी मनाच्या गरजांमध्ये जसा सारखेपणा आढळतो तसे वैचित्र्यही आढळते. हे ठिकठिकाणी असणारे वैचित्र्य माणसाचे महत्त्वाचे लक्षण आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.
  डॉ. मांडे यांनी लोकसाहित्य आणि विधी ह्यांचे संबंध पुष्कळ तपशिलाने स्पष्ट केले आहेत. हे स्पष्ट करीत असताना त्यांनी दिलेला पुरावा दुहेरी आहे. सर्वसामान्यपणे आपल्याला परिचित असणारे लोकसाहित्याचे प्रकार निर-- निराळया विधीशी कसे जोडलेले आहेत हे तर ते स्पष्ट करतातच पण त्याबरोबरच अशा परिचित नसणाऱ्या विधींचा गीतांशी व इतर साहित्यांशी असणारा संबंधही ते स्पष्ट करतात. या दृष्टीने त्यांनी दिलेली " नागमंत्र्यांची. भजने " अतिशय महत्वाची आहेत. अशी एक समजूत आहे की नागमंत्री हे : सापाचे विष उतरवितात. हे विष उतरविण्यासाठी हे मांत्रिक जी गाणी म्हणतात ती गाणी नसून विष उतरविण्याचे मंत्रच आहेत. जर या गीतांचा या विधींशी असणारा संबंध आपण लक्षात घेतला नाही तर केवळ गीते पाहून समहमनात त्यांचे स्थान काय आहे याचा बोध होणे कठीण आहे. मळ कल्पना अशी आहे की नाग ही देवता आहे. ह्या देवतेचे जे भक्त आहेत त्यांनी देवतेला प्रसन्न करणारे मंत्र म्हटल्यानंतर त्या मंत्राच्या प्रभावाने विष उतरून जाते. सर्प विषावरच नव्हे तर इतरही अनेक आजारावर मंत्र आहेत. विशिष्ट विधीच्या वेळी विशिष्ट साधक हे मंत्र म्हणतात त्याचा परिणाम म्हणन आजार दूर होतो. वरवर पाहताना हे मंत्र पुन्हा गाणीच दिसतात. काही गीते निरनिराळ्या लोकधर्मातील दीक्षा-संस्काराच्या वेळी म्हणावयाची असतात. थोडक्यात म्हणजे लोकसाहित्याच्या प्रसिद्ध प्रकारामागचे विधी आणि लोकाचारातील प्रमुख विधींच्या निमित्ताने येणारी गोते असा दहेरी पुरावा देऊन मांडे यांनी आपला मुद्या सिद्ध केला आहे.

  लोकसाहित्याचा विधींशी संबंध निश्चित करून दाखवणे आणि विधींच्या संदर्भात लोकसाहित्याची मीमांसा करणे हा या ग्रंथाचा प्रमुख विशेष आहे. अशा प्रकारचे ग्रंथ कधी परिपूर्ण असू शकत नाहीत. ते फक्त दिशा दाखवणारे असतात. विषयाला परिपूर्णता येण्यासाठी ही दिशा मान्य करणाऱ्या कैक संशोधकांच्या प्रयत्नांची गरज असते. शिष्टांनी अर्धवटपणे स्वीकारलेल्या लोकदेवता. आणि शिष्टांनी मुळीच न स्वीकारलेल्या लोकदेवता यांच्या बाबतीतील सर्व कथा, समजुती आणि विधी एकत्र गोळा करणे हे एक अवाढव्य काम आहे. हे, एका माणसाच्या अटोक्यात कधीच येणार नाही. लोकसाहित्याच्या फक्त नृत्य

१३४

ओळख