पान:ओळख (Olakh).pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हनुमंताच्या कहाण्यात त्याच्याशी निगडीत असणान्या विधीत आणि समजतीत हे सगळेच पदर एकत्र मिसळलेले आहेत. लोकसाहित्याचा विधीशी संबंध स्पष्ट केला तरी कोणते विधी अतिप्राचीन, कोणते प्राचीन आणि कोणते तुलनेने अर्वाचीन हे सांगता येणे कठीण आहे. विधींच्या बाबतीत सुद्धा ही काळजी घेणे भाग आहे. हे एक अडचणीचेच ठिकाण आहे.
 आज एक विधी अस्तित्वात असतो. हा विधी लोकप्रिय असतो पण हा विधी किती प्राचीन आहे हे पुराव्याने स्पष्ट करणे कठीण असते. लोकाचाराच्या प्राचीन परंपरांचे हे पुरावे नेहमीच देता येत नाहीत, ही या क्षेत्रातील अडचण आहे. अगदी परवापर्यंत आमच्याकडे म्हणजे मराठवाड्यात आजारी मुलांवरून लिंबू ओवाळून रस्त्यावर फेकण्याची पद्धत सर्रास सुरू होती. अशी रस्त्यात पडलेली शेंदूर लावलेली लिंबे ओलांडू नयेत, नाही तर आपल्याला आजार होतो अशीही समजूत होती. एक कल्पना अशी आहे, आजारी माणसाचा आजार ओवाळून टाकलेल्या लिंबात उतरतो. आणि ते ओलांडणान्याच्या अंगात शिरतो. दुसरी कल्पना अशी आहे की, आजारी माणसाच्या नावाने आजाराच्या देवतेला बळी दिला जातो. मूळ व्यक्तीऐवजी हा बळी स्वीकारून देवता मूळ व्यक्तीला रोगमुक्त करतात. पैकी मानव बळीच्या ऐवजी पशू, पशूऐवजी कोणतेही नारळ, लिवासारखे फळ अशी ही परंपरा आहे. आता लिंब उतरण्याच्या विधीत कोणती नेमकी कल्पना जुनी आहे आणि हे विधी किती प्राचीन आहेत याबाबत सांगता येणे कठीण असते. कित्येकदा एखादी कल्पना अर्वाचीन असते पण ती दिसायला मात्र अतिशय प्राचीन दिसते. लक्ष्मीपूजनातील सर्व भाजीपाल्यांची म्हणन समद्धीची देवता आणि निर्मिती देवतेची पूजा, सजन देवतेची पूजा हा भाग अति प्राचीन आहे. त्यामानाने धनदेवतेची पूजा अर्वाचीन आहे. लक्ष्मीने कुठे पळून जाऊ नये म्हणून तिला लंगडी करण्याची कल्पनाही . अशीच अर्वाचीन आहे. धन पुरण्याची प्रथा सुरू झाल्यानंतर उकिरड्यात लक्ष्मी असल्याची कल्पना येते. त्याचा विस्तार केरसुणी व कचरा ही लक्ष्मीची निवासस्थाने असा होतो. ह्या कल्पनांची नोंद पद्म पुराणात आहे हे मान्य केले तरी लक्ष्मीपूजनात केरसुणी महत्त्वाची नसून सोळा भाज्या महत्त्वाच्या आहेत. ही महत्त्वाची बाब विसरता येणार नाही.

  मांडे यांनी लोकसाहित्यात रूढ असलेले रामायणातील कहाणींचे काही सदभं नोंदविलेले आहेत. वाल्मिकीच्या रामायणापेक्षा लोकगीतांमध्ये असणारे रामायण पुष्कळच निराळे आहे. लोकगीते आणि लोककथा यांतील रामकथेचे संदर्भ कोणत्याही पुराणात सापडणारे नाहीत. एक कल्पना अशी आहे की, सीता ही सदाशिवाची म्हणजे शंकराची बहीण आहे. एक कल्पना अशी आहे की,

१३६

ओळख